sachin sawant criticize to modi govt  
देश

Modi Govt : 'मोदी सरकारच्या कृपेने आता मरणही महाग झालंय'

'मरणाच्या दारावर ही मोदी सरकार टॅक्स वसूल केल्याशिवाय वर जाऊ देणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

'मरणाच्या दारावर ही मोदी सरकार टॅक्स वसूल केल्याशिवाय वर जाऊ देणार नाही'

बिगर ब्रँडेड पण लेबल लावून विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर बहुचर्चित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू होणार असल्यामुळे देशात महागाईमध्ये भर पडणे अपरिहार्य आहे. बिगर ब्रँडेड वस्तू विकताना त्यावर पाच टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. त्याच वेळी ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रुग्णालय खोल्यांसाठी जीएसटी आकारण्यात येणार असल्याने वैद्यकीय सेवाही महागणार आहेत. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयावर आता विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.

कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यात ते म्हणतात की, मोदी सरकारच्या कृपेने आता मरण ही महाग झाले आहे. मरणाच्या दारावर ही मोदी सरकार टॅक्स वसूल केल्याशिवाय वर जाऊ देणार नाही. भाजपाचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत किती व्यापक आहे हे लक्षात घ्या, असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

जीएसटीचे करस्तर ठरवणाऱ्या जीएसटी परिषदेची मागील महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत जीएसटीतून वगळण्यात आलेल्या; तसेच जीएसटी सवलत मिळणाऱ्या अनेक वस्तूंना जीएसटी कक्षेअंतर्गत आणण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी अनेक वस्तू व सेवांवर जीएसटी वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीत याविषयीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

दरम्यान, या निर्णयामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वाढत्या महागाईचा सामना करत असलेली सर्वसामान्य जनता कोरोना साथीतून सारवलेली नाही. तोच हा निर्णय लागू केल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. इंधनाच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याशिवाय महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर विजेसह गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे दुहेरी फटका बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT