Akhilesh Yadav
Akhilesh Yadav esakal
देश

अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात; पाहा कुठून लढणार?

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Election) लढवणार आहेत. गुरुवारी त्यांनी आपल्या मतदारसंघाची घोषणाही केली. मैनिपुरी जिल्ह्यातील कऱ्हाल विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. कऱ्हाल (Karhal) इथं २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. (Samajwadi Party chief Akhilesh Yadav to contest UP polls from Karhal constituency)

सध्या अखिलेश यादव हे लोकसभेचे खासदार आहेत. आझमगडमधून मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी कधीही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. जेव्हा ते सन २०१२ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते तेव्हा त्यांनी विधानपरिषदेतून विधीमंडळाचं सदस्यत्व मिळवलं होतं.

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे मैनिपूर सदर, कनौजमधील चिब्रामाऊ, आझमगडमधील गोपालपूर किंवा संभालमधील गुन्नूर येथून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती. पण अखेर ते कऱ्हाल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

सध्या शोभन सिंह यादव हे कऱ्हाल येथून समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. १९९३ पासून सात वेळा समाजवादीपार्टीनं ही जागा जिंकली आहे. पण २००२ मध्ये भाजपनं ही जागा आपल्या खिशात घातली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT