Akhilesh Yadav sakal
देश

हरलेला पैलवान कधी चावतो तर कधी...अखिलेश यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

भाजपला खरे सरप्राईज गुजरातमधून मिळणार असल्याचे अखिलेय़ यांनी सांगितले.

निनाद कुलकर्णी

गाजियाबाद : उत्तर प्रदेशात सत्ताधारी (UP Assembly Election 2022) भाजप घाबरलेले असून हारणार पैलवान कधी चावतो तर कधी बोचकारतो अशी बोचरी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शनिवारी केली आहे. हे लोक हरले असून, शेतकरी आणि तरुण यांचा पराभव करतील असे सांगत, उत्तर प्रदेशात समाजवादी आघाडीचे (Samajwadi Party) सरकार स्थापन होणार आहे हे प्रत्येक वर्गातील लोकांनी मान्य केले आहे, असा दावा अखिलेश यांनी केला. यावेळी त्यांनी इथे सरप्राईज मिळणार नाही, पणे भाजपला खरे सरप्राईज गुजरातमधून मिळणार असल्याचे अखिलेश यांनी सांगितले.

यूपीच्या जनतेने आपला निकाल दिला असून, येथे सपाचे सरकार स्थापन होणार आहे, हे येथील जनतेने, विशेषतः शेतकरी, तरुण व्यापारी, प्रत्येक वर्गातील लोकांनी मान्य केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा आदर करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असे अखिलेश म्हणाले. (UP Election Latest News In Marathi)

तीन कृषी कायद्यांचा (Farmer Law) संदर्भ देत अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केला की, भाजपने शेतकऱ्यांचा अवमान का केला? भाजपने (BJP) अन्नदात्यांचा अपमान केला हे शेतकरी कसे विसरणार, असे अखिलेश म्हणाले. सपा आणि आरएलडी आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, आज जयंत चौधरी माझ्यासोबत आहेत आणि आम्ही दोघेही शेतकऱ्यांचा लढा एकत्र लढत आहोत याचा मला आनंद आहे.

चौधरी चरणसिंग यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) समृद्धीसाठी लढा दिला हे वास्तव मतदारांना माहीत आहे. सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांनी आंदोलने केली. जयंत चौधरी आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सर्वांना चौधरी चरणसिंग यांचा वारसा वाचवण्याची आणि पुढे नेण्याची संधी मिळाली असल्याचेदेखील अखिलेश यादव यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT