Guardian Minister Satish Jarkiholi esakal
देश

Karnataka : बुद्ध-बसव-आंबेडकरांना मानणारा नेता बनला बेळगावचा 'पालकमंत्री'; मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती

बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अपेक्षेप्रमाणे सतीश जारकीहोळी यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : डोकेदुखी ठरलेल्या जिल्हा पालकमंत्र्यांची अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी नियुक्ती केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यावर डोळा ठेवत काँग्रेस सरकारने (Congress Government) नुकतेच विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली.

बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अपेक्षेप्रमाणे सतीश जारकीहोळी यांची नियुक्ती करण्यात आली असून, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे उडुपी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बंगळूर शहर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे.

तर, माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना तुमकूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक मंत्र्यांची नजर आपापल्या जिल्ह्यावर आहे.

विशेषत: एकाच जिल्ह्यातील दोन मंत्र्यांमध्ये जिल्हा पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा होती, तेथे जोरदार लॉबिंग होते. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना जिल्हा पालकमंत्रिपदाची नियुक्ती करताना डोकेदुखी झाली होती. मात्र, आता सर्व संभ्रम दूर होऊन अखेर जिल्हा पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हावार पालकमंत्री असे :

  • जिल्हा पालकमंत्री

  • बंगळूर शहर डी. के. शिवकुमार

  • तुमकूर डॉ. जी. परमेश्वर

  • गदग एच. के. पाटील

  • बंगळू ग्रामीण के. एच. मुनिअप्पा

  • रामनगर रामलिंगा रेड्डी

  • चिक्कमगळूर के. जे. जॉर्ज

  • विजापूर एम. बी. पाटील

  • मंगळूर दिनेश गुंडूराव

  • म्हैसूर एच. सी. महादेवाप्पा

  • बेळगाव सतीश जारकीहोळी

  • गुलबर्गा प्रियांक खर्गे

  • हावेरी शिवानंद पाटील

  • विजयनगर जमीर अहमद खान

  • यादागिरी शरणबसप्पा दर्शनापूर

  • बिदर ईश्वर खांड्रे

  • मंड्या चेलुवरायस्वामी

  • दावनगिरी एस. एस. मल्लिकार्जुन

  • धारवाड संतोष लाड

  • रायचूर शरणप्रकाश पाटील

  • बागलकोट आर. बी. थिम्मापुर

  • कोप्पळ शिवराज

  • चित्रदुर्ग डी. सुधाकर

  • बळ्ळारी बी. नागेंद्र

  • हासन के. एन. राजण्णा

  • कोलार बैराती सुरेश

  • उडुपी लक्ष्मी हेब्बाळकर

  • कारवार मंकाळ वैद्य

  • शिमोगा मधु बंगारप्पा

  • चिक्कबळ्ळापूर डॉ. एम. सी. सुधाकर

  • कोडगू एन. एस. बोसराजू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT