satyapal malik - Narendra modi and Amit Shah 
देश

Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांचा पंतप्रधान मोदींबाबत खळबळजनक विधान; म्हणाले निवडणुकीआधी...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही महिन्यांपूर्वीच खळबळजनक गौप्यस्फोट करत देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत गौप्यस्फोट करताना पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर काही आरोप केले होता. आता देखील सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक दावे केले आहेत.

सत्यपाल मलिक म्हणाले की, २०२४ मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राममंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात किंवा भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याची हत्या घडवून आणू शकतात. जे लोक पुलवामा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात. या लोकांना कशाचीही परवा नाही. ते चुकीच्या मार्गाने चालले आहेत, असा दावा मलिक यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्‍मीरकडे दुर्लक्ष होते आणि येथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानेच नंतर पूलवामा हल्ला झाला, असा सनसनाटी आरोप याआधी सत्यपाल मलिक यांनी केला होता. मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारसा तिटकाराही नाही, असेही मलिक यांनी म्हटले होते.

जवानांना हवाई मार्गाने नेण्याची ‘सीआरपीएफ’ने केलेली मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळली होती, जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती, असा दावा मलिक यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT