vijay mallya E sakal
देश

Vijay Mallya : विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा झटका! संपत्तीची जप्ती थांबवण्याची विनंती फेटाळली

स्टेट बँकेला ९००० कोटींचा चुना लावून विजय मल्ल्या देश सोडून पळून गेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेला ९,००० कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. गुन्हेगार घोषीत करण्यापासून तसेच संपत्ती जप्त करण्याची कारवाई रोखावी, अशी विनंती याचिका त्यानं दाखल केली होती, ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

विजय मल्ल्याला आर्थिक गुन्हेगार घोषीत करणे आणि त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी मुंबईच्या स्थानिक कोर्टानं कारवाही सुरु केली आहे. ही कारवाई थांबवण्यात यावी, यासाठी मल्ल्याच्या वकिलानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण या याचिकेची दखल घेता येणार नाही, असं सांगत ही याचिका फेटाळून लावली.

सुप्रीम कोर्टानं मल्ल्याच्या याचिकेवरुन ७ सप्टेंबर २०१८ रोजी ईडीला नोटीस पाठवली होती. तसेच मुंबईत पीएमएलएच्या विशेष कोर्टासमोर तपास यंत्रणांच्या याचिकेवर कारवाईवर करण्यास नकार दिला. दरम्यान, या विशेष कोर्टानं पीएमएलए कायद्यानुसार ५ जानेवारी २०१९ रोजी विजय मल्ल्याला फरार घोषित केलं.

हे ही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

फरार घोषित झाल्यानंतर विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये राहत असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारनं प्रक्रिया सुरु केली आहे. पण अद्याप त्याला भारतात आणण्यात यश आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT