Supreme Court  esakal
देश

Stalin Youtuber Row: CM स्टॅलिन यांच्यावर टीका करणाऱ्या युट्यूबरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा! कोर्टानं म्हटलं, निवडणुकीच्या तोंडावर...

या युट्युबरनं नेमकं काय केलं होतं हे जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या सत्ताई दुराईमुरुगन या युट्यूबरला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. त्याचा जामीन पूर्ववत करत कोर्टानं एक महत्वाची टिप्पणीही केली. "जर निवडणुकांपूर्वीच आपण प्रत्येकाला अशा पद्धतीनं तुरुंगात टाकायला सुरुवात केली तर कल्पना करा किती जण तुरुंगात जातील" असं कोर्टानं म्हटलं आहे. (SC Restores YouTuber Bail Over Remarks Against MK Stalin Says Cant Put Everyone Making Allegations Behind Bars)

सुप्रीम कोर्टात घेतली धाव

एमके स्टॅलिन आणि इतरांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दुराईमुरुगन याला अटक केली होती. यापूर्वी, मद्रास हायकोर्टानं त्याला जामीन मंजूर करताना तो पुन्हा कोणाच्याही विरोधात अपमानास्पद टिप्पणी करणार नाही अशी अट घातली होती. पण, जून 2022 मध्ये तामिळनाडू सरकारनं हमीपत्र दाखल केल्यानंतरही आरोपीनं सीएम स्टालिन यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करणं सुरू ठेवल्यानं या युट्युबरचा जामीन रद्द करण्यासाठी तामिळनाडू सरकारनं हायकोर्टात धाव घेतली, त्यानंतर हायकोर्टानं त्यांचा जामीन रद्द केला. यानंतर युट्युबरनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

स्वातंत्र्याचा गैरवापर नाही

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय फिरवला आणि त्याला पुन्हा जामीन मंजूर केला. हा जामिन मंजूर करताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, "हायकोर्टानं यापूर्वी मुरुगन याला अंतरिम जामीन दिला त्यानुसार तो अडीच वर्षे जामिनावर आहे. पण त्यानं स्टॅलिन यांना विरोध करून किंवा मत व्यक्त करून आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला असं म्हणता येणार नाही," असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर "युट्युबरचा जामीन रद्द करण्यामागचं सबळ कारण दिसत नाही. त्यामुळं आम्ही अशा प्रकारे जामीन रद्द करण्याचा हायकोर्टाचा आदेश रद्द करतो आणि जामीन मंजूर करणारा पूर्वीचा आदेश लागू ठेवतो. योग्य वाटल्यास जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही" अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं आपला निकाल दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT