देश

दहावी-बारावीच्या शाळा ओडिशात सुरू 

सकाळन्यूजनेटवर्क

भुवनेश्‍वर- लॉकडाउनमुळे नऊ महिने बंद असलेल्या ओडिशातील दहावी व बारावीच्या शाळा शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घेत, मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सुरक्षित अंतर राखून विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली. 

राज्य सरकारच्या आदेशानुसार दहावी व बारावीचे वर्ग आज सुरू झाले असून महाविद्यालयातील तृतीय वर्षाचे वर्ग येत्या ११ रोजी सुरू होणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरू होत असल्याचा आणि मित्र व शिक्षक भेटणार असल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान घेऊनच शाळेत सोडले जात होते. प्रत्यक्ष वर्गाला सुरुवात झाल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले. दहावीची बोर्डाची परीक्षा ३ ते १५ मे रोजी तर बारावीची परीक्षा १५ मे ते ११ जून या कालावधीत होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची गुप्त बैठक कॅमेऱ्यात; पहिला फोटो होताच राजकीय वर्तुळात खळबळ, मास्टरमाईंडही समोर

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

MSEB Share Market : महावितरण शेअर मार्केटमध्ये येणार, खासगीकरणाकडे वाटचाल; राज्य सरकारचा प्रस्ताव, आयपीओ ओपन करण्यावरून नवा वाद

IPL 2027 Trade: रिषभ पंतला पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणण्यात 'दोन' मोठ्या व्यक्तींचा हात; KKR ही होते मैदानात, पण LSGच्या हट्टामुळे Deal फिसकटली

BEST Strike : मुंबईकरांचे हाल... बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; मेट्रो, रेल्वेत गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT