Seema Haider Pakistan Sakal
देश

Seema Haidar:सीमा हैदर सचिनच्या घरात येताचं कुटुंबाचे खाण्यापिण्याचे वांदे! पूर्ण कुटुंब नजरकैदेत

Seema haidar news: सीमा हैदरवर गुप्तहेर असल्याच्या संशयामुळे सचिनच्या घरातील कोणालाही घराबाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Seema Haidar-Sachin Meena:सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमप्रकरणावर आता गरिबीचे सावट ओढवतंय. सीमाचा प्रियकर सचिन आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला घरातून बाहेर निघणं अवघड झालंय. घरातील किराणाही संपत आलाय.

मूलभुत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. घरातील मिळकत पूर्णपणे बंद झालीये. अशातचं घरातील सगळ्या लोकांचे अन्नावाचून हाल होत आहेत. सचिनच्या वडीलांचा एक व्हिडीओ समोर आलाय ,ज्यात त्यांनी घराची आर्थिक स्थितीविषयी माहिती दिली.

पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी भारतात पळून आलेल्या सीमा हैदरच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला रस येतोय. मात्र, तपास यंत्रणांचा संशय दिवसेंदिवस तिच्यावर बळावत चाललाय. सीमा सध्या जामीनावर बाहेर आहे. ती तिच्या प्रियकरासोबत रबूपुरा या ठिकाणी राहत आहे. घरातल्या कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. घराबाहेर पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

सचिनचे वडील नेत्रपाल यांनी सांगितलं की," आम्ही काहीचं कमवतं नाही आहोत. आम्ही रोज काम करुन घर चालवणारे लोक आहोत. खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. आम्ही लोक दिवसंभर घरातचं असतो."

माध्यमांच्या अहवालानुसार, नेत्रपालने पुढे सांगितलं की,"कमाई न झाल्याने घरातील किराणा संपलाय. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना एक पत्रही लिहिलं, ज्यात त्यांनी घरातील परिस्थितीचं वर्णन केलंय.त्यांनी विनंती केलीये की या अडचणीतून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, जेणेकरुन त्यांच्या पोटापाण्याची सोय होईल."

नेत्रपालने सांगितले की मिळकत नसल्यामुळे घरातील सर्वांना त्रास होत आहे. त्याचबरोबर अशीही माहिती मिळतीये की काही दिवसांपासून सचिन आणि सीमाची तब्यत खराब होत आहे.

एटीएससह आणखी तपास यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत. सीमावर आरोप लावण्यात आलाय की ती पाकिस्तानची गुप्तहेर आहे आणि तिने दावा केलाय की तिचं सचिनवर खरं प्रेम आहे. त्याच्यासोबत जगण्या-मरण्यासाठी आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रेमप्रकरणाच्या या नायिकेने सांगितलं की पबजी गेम खेळताना त्यांचं सुत जुळलं. दोघे रात्रभर बोलायचे. नंतर दोघे नेपाळमध्ये भेटले. सात दिवस एकमेकांसोबत वेळ घालवला.

पशुपतीनाथ मंदिरात त्यांनी लग्न केलं आणि नंतर मे महिन्यात सीमा आपल्या चार मुलांना घेऊन भारतात बेकायदेशीर पद्धतीने आली. सीमा भारतीय नागरिकत्वाची मागणी करत आहे. राष्ट्रपतीकडे तिने दया याचिकाही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT