seema haider Sakal
देश

Seema Haider: सचिनच्या आनंदाला राहिली नाही 'सीमा'! सीमा हैदरनं मुलाखतीत दिली गुडन्यूज

पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेली व्यक्ती आहे.

सकाळ डिजिटल टीम

नोएडा : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेली व्यक्ती आहे. पब्जी हा ऑनलाईन गेम खेळताना उत्तराखंडमधील सचिन मीणाच्या प्रेमात पडलेल्या या चार मुलांच्या आईनं आता आणखी एक गुड न्यूज दिली आहे. सीमा हैदर याच वर्षी सचिनच्या बाळाची आई होणार आहे. एका न्यूज चॅनेलला मुलाखतीत तीनं ही माहिती दिली. आज तकनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Seema Haider Sachin Meena have good news will gave birth a child says in an interview)

मुलाखतीत दिली स्पष्टोक्ती

माध्यमातील वृत्तानुसार, सीमा हैदरची मुलाखत सुरु असताना सचिन आणि सीमा यांच्या नात्यावर काही प्रश्न विचारले गेले. यावेळी लवकरच आमचं मुलं असेल अशा शब्दांत तिनं एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. सचिनच्या कुटुंबियांनी देखील सीमा हैदर प्रेग्नंट असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Latest Marathi News)

लवकरच नवा वाढदिवस साजरा करणार

सीमानं मुलाखतीत म्हटलं की, २०२४ मध्ये आनंदाची वार्ता येणार आहे. आमच्या घरी आनंदाचं वातावरण असणार आहे. लवकरच आम्ही तुम्हाला देखील मिठाई खाऊ घालू. २०२४ मध्ये सचिनचा वाढदिवस आहे, त्याचबरोबर आणखी कोणाचा जन्म झाला तर चांगलं होईल, असंही सीमा हैदरनं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पब्जी खेळताना झाली ओळख

ऑनलाईन गेम पब्जी खेळताना भारतातला सचिन आणि पाकिस्तानातील सीमाचं सूत जुळलं. दोघंही या ऑनलाईन प्रेमात अखंड बुडाले अन् अखेर सीमा पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह थेट भारतात दाखल झाली. नेपाळमार्गेत ती उत्तराखंड या सचिनच्या घरी आली. या ठिकाणी त्यांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणं एकत्र राहत आहेत. (Latest Maharashtra News)

मुलांना भरतातच चांगलं भविष्य

भारतात तीनं दिवाळी, करवाचौथ हे सणही साजरे केले. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी सीमा हैदरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवून दिली होती. एका व्हिडिओत सीमानं म्हटलं होतं की, तिच्या मुलांना भारतातच चांगलं भविष्य आहे. त्यांना उज्ज्व भविष्य सचिन मीणाच देऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT