mask 
देश

लाँच झाला सेल्फ सॅनिटायझिंग मास्क; 95 टक्क्यांपर्यंत विषाणूंना मारण्यास सक्षम

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशात अजुनही कोरोनाचा संसर्ग होत आहे. अद्याप कोरोनावर कोणतंही औषध किंवा लस सर्वसामान्यांपर्यंत आली नसल्यानं यावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. देशातील काही राज्यांमध्ये मास्क लावणं बंधनकारक असून काही कंपन्यांनी मास्क लाँच केले आहेत. यात आता Breathe Easy या कंपनीनेही स्पेशल मास्क लाँच केला आहे. 

KARBON असं नाव असलेला हा फेस मास्क 95 टक्के व्हायरसला निष्क्रिय करतो असा दावा कंपनीने केला आहे. फक्त काळ्या रंगात उपलब्ध असलेला हा मास्क नेल्सन लॅबने मान्यता दिलेला आहे. या मास्कमध्ये तीन लेअर देण्यात आल्या आहेत. यातील बाहेरील लेअर फॅब्रिक लेअर असून यात बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून एअरबॉर्न कंटेट ब्लॉक केला जातो. तसंच डबल नाइट लेअर हवेतील कणांना रोखते. तर तिसऱ्या बायोफॅब्रिक लेअरमध्ये अँटि मायक्रोबिअल्स असून यात व्हायरस आणि बॅक्टेरियाला मारण्याची ताकद असते. 

कंपनीचे म्हणणे आहे की, मास्कची आतली लेअर सॉफ्ट आहे त्यामुळे जास्त काळ मास्क घालणं त्रासदायक नसेल. त्यासोबतच आतली लेअर सेल्फ सॅनिटायझिंग असून हाय क्वालिटी यॉर्न कापडापासून तयार करण्यात आला आहे. KARBON मास्कची किंमत 799 रुपये इतकी आहे.

याआधी Xiaomi कंपनीने फेस मास्क लाँच केला आहे. कंपनीने म्हटलं होतं की, हा मास्क घालणं आरामदायी असून वापरणाऱ्यांना नक्कीच आवडेल. मास्कच्या सपोर्ट फ्रेमचा शेप बदलता येऊ शकतो. फेस मास्क चेहऱ्यावर फिट बसतो त्यामुळे एअर टाइटनेस आणखी चांगली होते असंही सांगितलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT