selfie craze lands two girls in trouble after they wade into raging pench river 
देश

Video: युवती गेल्या सेल्फी काढायला नदीत अन्...

वृत्तसंस्था

छिंदवाडा (मध्य प्रदेश): जगभरात सेल्फी काढताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, अनेकजण जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रसंग येथे घडला असून, दोन युवतींना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: 'हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!'

दोन युवती नदीच्या मध्यभागावरील दगडावर उभ्या राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होत्या. पण, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्या अडकल्या आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना नदी ओलांडणे कठीण झाले होते. पाण्याचा वेग वाढायला लागल्यानंतर दोघी घाबरू लागल्या. दोघींच्या मैत्रिणी नदीच्या किनाऱयावर उभ्या होत्या. त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक युवकांना मदतीला घेऊन दोघींना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, युवती पाण्यात अडकून पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण, अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून युवतींवर टीकाही केली आहे. यापूर्वीही सेल्फीच्या नादात अनेकजण पाण्यात वाहून गेले आहेत. युवतींचे नशीब बलवत्तर असल्याने त्यांचा जीव बचावला आहे, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी नोंदविल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT