देश

R Venkataramani : वेंकटरामानी भारताचे नवे महाधिवक्ता नियुक्त

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आर. वेंकटरामानी यांची देशाचे नवे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 13 एप्रिल 1950 रोजी पाँडिचेरी (आता पुडुचेरी) येथे जन्मलेले वेंकटरामाणी हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताच्या कायदा आयोगाचे सदस्य आहेत. (R Venkataramani news in Marathi)

तीन दशकांहून अधिक काळ ते सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे, विद्यापीठे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रतिनिधित्व केले आहे.

वेंकटरामानी यांनी जुलै 1977 मध्ये बार कौन्सिल ऑफ तामिळनाडूमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, 1979 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 1997 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केले. 2010 मध्ये त्यांची विधी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2013 मध्ये त्यांना कायदा आयोगाचे सदस्य म्हणून आणखी एक टर्म मिळाली होती.

वेंकटरामानी यांनी न्यायमूर्ती एम.एन. व्यंकटचलिया यांच्या अध्यक्षतेखालील संविधान पुनरावलोकन आयोगातही काम केले आहे. अनेक वकील संघटनांचे ते आजीवन सदस्य म्हणून जोडलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT