Accident News Esakal
देश

Accident News: अमृतसर-दिल्ली महामार्गावर भीषण अपघात; धुक्यांमुळे अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या, एकाचा मृत्यू

धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्याने अमृतसर दिल्ली महामार्गावर जवळपास १०० वाहने एकमेंकावर आदळली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्याने अमृतसर दिल्ली महामार्गावर अनेक वाहने एकमेंकावर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. पंजाबमधील खन्ना येथे ही दुर्घटना घडली आहे. या मार्गावर सध्या धडकलेल्या आणि खराब झालेल्या वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत.

पंजाबच्या लुधियाना येथील खन्ना भागात अनेक वाहने एकमेकांवर आदळली असून धुक्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाली आहे. या प्रकरणातील अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी थांबलेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानीसोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची शक्यता आहे.

या घटनेमध्ये 100 वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT