Sextortion Case 
देश

Sextortion Case: केंद्रीय मंत्र्याला कॉल आला अन् आक्षेपार्ह व्हिडिओ सुरू झाले... पोलिसांनी केली कारवाई

Sandip Kapde

Sextortion Case: सेक्सटॉर्शन कॉल करुन फसवून करण्याची नीवन पद्धत समोर आली. अनेक लोक यात अडकतात. आता थेट केंद्रीय मंत्र्याला सेक्सटॉर्शन कॉल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिल्ली गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सध्या सुरू आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना हा सेक्सटॉर्शन कॉल आला आहे. पटेल यांना सेक्सटोर्शन व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीय सचिवांनी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर गुन्हे शाखेने मोहम्मद वकील आणि मोहम्मद साहिब यांना अटक केली आहे. (latest marathi news)

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हिडिओ कॉल आला होता. तो कॉल रिसिव्ह करताच दुसऱ्या टोकाकडून आक्षेपार्ह व्हिडिओ सुरू झाले. त्यानंतर त्यांनी लगेच कॉल कट केला. मंत्र्यांच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले. गुन्हे शाखेने आयपीसी कलम 420 आणि 419 अंतर्गत एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला, त्यानंतर या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली.

हे काम एका लूटमार टोळीचे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या प्रकरणाचे तार राजस्थानशी जोडलेले असल्याचे तपासात समोर आले आहे, त्यानंतर मोहम्मद वकील आणि मोहम्मद साहिब या दोन आरोपींना राजस्थानमधील भरतपूर येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी एका संघटित टोळीशी संबंधित आहेत जे सेक्सटोर्शन कॉल करून ब्लॅकमेल करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT