देश

Bilkis Bano: बिल्किस बानो यांच्याबद्दल बोलताना शबाना आझमींना कोसळंल रडू

दोषींच्या सुटकेविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करण्यात आली

सकाळ डिजिटल टीम

बिल्किस बानोच्या दोषींच्या सुटकेविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सहभागी झालेल्या माजी खासदार आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी दोषींच्या सुटकेचा तीव्र निषेध केला आहे. काही विद्यार्थी आणि महिलांच्या गटांसह शनिवारी जंतरमंतर इथं या निर्णयाचा विरोध केला. तर “मला उलटी येते. हे संस्कारी लोक आहेत का? आणि सत्तेत असलेला व्यक्ती अशी टिप्पणी करत आहे”, असं त्या म्हणाल्या. शबाना आझमी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचसोबत नेटकऱ्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

“गुजरात सरकारने म्हटले आहे की, 1992 च्या कायद्यानुसार दोषींना सोडण्यात आले आहे. त्याच वर्षी 2022 मध्ये गृहमंत्रालयाने एकाही बलात्काऱ्याला सोडले जाणार नाही असे सांगितले होते. पण मग गुजरात सरकारने हा आदेश कसा दिला? केंद्राच्या परवानगीशिवाय गुजरात सरकार असे पाऊल उचलू शकेल का? त्यामुळे महिला या नात्याने,आणि एक भारतीय म्हणून, सर्वात मोठी गर्दी जमवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि आपण असे अत्याचार सहन करणार नाही, हे एकत्र येत सांगूया अंसही त्या म्हणाल्या आहेत. बिल्कीस बानो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत जे घडले त्या नंतर आपण आपल्या भारताला असे करताना पाहू शकत नाही. म्हणूनच आपण सर्व मिळून आवाज उठवू"

‘बिल्किस बानोसाठी न्यायाची मागणी करु. तिच्या आई आणि बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आणि बिल्किस बानोच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्या 11 दोषींना पुन्हा तुरुंगात टाका. त्यांची खूप लवकर सुटका झाली. आता त्यांना हार आणि मिठाई देऊन हिरो म्हटलं जात आहे. आपल्यात माणुसकी उरली नाही का? न्यायाची ही किती फसवणूक आहे,’ अशी पोस्ट लिहुन प्रश्न विचारला आहे.

“दोषी हे चांगले संस्कार असलेल्या ब्राह्मण कुटुंबातील आहेत,” असं भाजप आमदार सीके राऊलजी (माफीची शिफारस करणाऱ्या समितीचे सदस्य) म्हणाले होते.

ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन म्हणाल्या की, “आरोपींना माफी नव्हे तर बक्षीस देण्यात आलं आहे. त्यांना पुष्पहार घालण्यात आला आणि मिठाई भरवण्यात आली.” “हे कसं शक्य आहे? गुजरात सरकारने हा आदेश कसा दिला? आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे. महिला आणि भारतीय नागरिक म्हणून आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की, हे सहन केलं जाऊ शकत नाही,” असंही शबाना म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT