minor girl suicide
minor girl suicide sakal media
देश

बिहार : ...अन् अल्पवयीन मुलीनं सहाव्या मजल्यावरुन मारली उडी!

नरेश शेंडे

बिहारमध्ये (Bihar) एका अल्पवयीन मुलीनं तिच्या वडिलांसोबत (Arguments with father) झालेल्या वाद विवादामुळं हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Minor gir suicide) केल्यची धक्कादायक घटना घडली आहे. शिखा यादव (shikha yadav) (१७) असं तिचं नावं आहे. नीट युजी परिक्षेसाठी (Neet UG exam) तयारी करण्याऱ्या शिखानं टोकाचं पाऊल उचलून शनिवारी सकाळी स्वत:ला संपवलं. शिखाला घरी परत घेवून जाण्यासाठी शिखाचे वडिल तिची पुस्तकं आणि इतर अभ्यासाचं साहित्य पॅक करत असताना त्यांच्यामध्ये मतभेद झाले. त्यामुळे शिखानं आत्महत्या केली अशी माहिती सूत्रांनी दिलीय. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Shikha yadav jumps from kota hostel building and committed suicide argument with father)

याबाबत सविस्तर वृत्त असं की, "कोरोना निर्बंधामुळं शाळा आणि क्लासेस बंद असल्याने शिखाचे वडिल तिला घरी परत नेण्यासाठी शुक्रवारी कोटा येथे आले होते. घरी परत जाण्यावरुन त्यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर रागाच्या भरात शिखा सहाव्या मजल्यावर चढली आणि तिने बाल्कनीतून उडी मारली. त्यानंतर शिखाला तातडीनं एमबीएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, शिखाचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. घटनास्थळी कोणलीही सुसाईड नोट सापडली नाही. वडिलांसोबत झालेल्या वादामुळे रागाच्या भरात शिखाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं". अशी माहिती कुन्हारीचे एसएचओ गंगा सहाय शर्मा यांनी पीटीआयला दिली आहे.

शवविच्छेदन झाल्यानंतर शिखाचा मृतदेह पोलिसांनी तिच्या वडिलांच्या ताब्यात दिला. सीआरपीसीच्या सेक्शन १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. असंही शर्मा यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT