Supreme Court  sakal
देश

ShindeVsThackeray: बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य होता! जेठमलानींचा जोरदार युक्तीवाद

शिंदे गटाच्यावतीनं अॅड. महेश जेठमलानी सध्या सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ShindeVsThackeray : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे गटाकडून सध्या अॅड. महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीचा राज्यालांचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. (Shinde Vs Thackeray in Supreme Court Governor decision was right Strong argument of Jethmalani)

महेश जेठमलानी हे मध्य प्रदेशातील एका केसचा हवाला देताना म्हणाले की, उपाध्यक्षांना यासंदर्भात निर्णय करायचा आहे, म्हणून राज्यपाल बहुमताची चाचणी थांबवू शकत नाहीत. हेच मध्य प्रदेशच्या २०२०च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करत काँग्रेसचं कमलनाथ सरकार कोसळलं होतं, हा त्यावेळेचा हवाला आहे. याद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न केला.

जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना म्हणाले, जेव्हा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस दिली तेव्हा दोन दिवसांची मुदत दिली होती. कायद्यानुसार किमान सात दिवसांची मुदत देणं अपेक्षित होतं. २९ तारखेला उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला कारण आपणं बहुमत चाचणी सिद्ध करु शकणार नाही हे त्यांना माहिती होत. त्यामुळं नोटिसा आम्हाला विहित नमुन्यात मिळाल्या नव्हत्या तर याचा केसवर मोठा परिणाम होत नाही.

यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्याचदिवशी अपात्रतेसंबधीची कारवाई सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली होती. मग या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं हा फरक पडला आहे का? असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT