IPS officer Shivdeep Lande filing his nomination papers for the upcoming Bihar Assembly Elections, marking his official entry into politics.

 

esakal

देश

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EX- IPS officer Shivdeep Lande to contest Bihar Assembly elections : जाणून घ्या, नेमकं कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Shivdeep Lande Enters Politics: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आता राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना उमेदवारी जाहीर केली जात आहे. तर याच पार्श्वभूमीवर आता बिहारमध्येच नव्हे तर देशभरात चर्चेत राहिलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे हे देखील आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे आता बिहारचे सिंघम राजकीय आखाड्यात ताकद लावणार आहेत.

माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. पोलिस दलातील त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे ते कायम चर्चेतही राहिलेले आहेत. शिवाय, कणखर आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा राहिलेली आहे. मात्र त्यांनी पोलिस दलातून बाहेर पडून ८ एप्रिल २०२५ रोजी हिंद सेना पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून त्यांची एकप्रकारे राजकारणाची नवीन इनिंग सुरू झाली होती.

त्यानुसार ते आता मुंगेर आणि आररिया येथून निवडणूक लढवणार आहेत, त्यांनी याबबत सोशल मीडियावर पोस्टकरून माहिती दिली आहे. तर शिवदीप लांडे यांच्यासारखे प्रसिद्ध व्यक्ती निवडणूक लढवणार असल्याने मुंगेर आणि अररियाच्या राजकीय वर्तुळात आणि बिहारमध्येही खळबळ उडाली आहे.

शिवदीप लांडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी स्वत:ला "तुमचा आपला मुलगा, तुमचा सेवक" असे संबोधले आणि जनतेचा पाठिंबा मागितला आहे. तसेच त्यांनी घोषणा केली की ते गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता जमालपूरमधील योगमाया दुर्गा स्थानावर पूजा केल्यानंतर त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील. त्यानंतर, जमालपूरच्या जुबली वेल चौकातून एक भव्य बाईक रॅली काढली जाईल  आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंगेर सदर उपविभाग कार्यालयात जातील.

लांडे यांनी त्यांच्या संदेशात स्पष्ट केले की, ही उमेदवारी केवळ त्यांचे वैयक्तिक पाऊल नाही तर बिहारच्या लोकांच्या आकांक्षा, आशा आणि बदलाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. त्यांनी लोकांना या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याचे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहून त्यांचा प्रवास यशस्वी करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-EU Trade Deal : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-युरोप करार झाला, तुमच्यासाठी आता काय स्वस्त होईल?

Kolhapur Politics : कोल्हापुरात भाजपला खिंडार? इंगवले गट एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करणार प्रवेश

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राधा पाटील पलटली? आता म्हणते, 'तो माझा पास्ट होता' व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai Fire: मालाड मधील मालवणीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; ६ जण गंभीर जखमी

U19 World Cup : ४ चौकार अन् ४ षटकारांसह वैभव सूर्यवंशीने विक्रमी फिफ्टी झळकावली, पण मोठा शॉट मारण्याच्या नादात झाला आऊट

SCROLL FOR NEXT