Sanjay Raut
Sanjay Raut 
देश

राहुल गांधींनी 'क्रोएशिया'प्रमाणे जिंकली मने; शिवसेनेची स्तुतीसुमने

वृत्तसंस्था

मुंबई : संसदेत अविश्वास प्रस्तावावेळी झालेल्या चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार स्तुती केली आहे. राहुल गांधी यांनी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या क्रोएशियाप्रमाणे नागरिकांची मने जिंकल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

मोदी सरकारविरोधात विरोधकांनी मांडलेल्या अविश्‍वास ठरावावरील चर्चेवेळी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. पण, दिवसभर चर्चा झाली ती राहुल गांधींच्या भाषणाची आणि त्यांनी नरेंद्र मोदींची घेतलेल्या भेटीची. ओबामा, ट्रम्प, पुतीन यांच्यासारख्या जागतिक नेत्यांना मिठी मारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांनी आज अचानक "जादू की झप्पी' दिल्यानंतर अवघे सभागृह स्तब्ध झाले. या घटनेनंतर मोदीही काहीक्षण गांगारून गेले होते, मिठीतून मार्गस्थ होणाऱ्या राहुल यांना त्यांनी परत जवळ बोलावून घेतले अन्‌ त्यांच्याशी छोटेखानी संवाद साधत पाठही थोपटली.

याविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, ''फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाचा पराभव झाला असला तरी त्यांनी जगभरातील फुटबॉलप्रेमींची मने जिंकली होती. तसेच काही काल संसदेत पाहायला मिळाले. मोदींचे भाषण हे पंतप्रधानांचे भाषण होते. मोदीजी हे मोदीजीच आहेत. आजही त्यांची तुलना कोणाशी करणे योग्य नाही. पण, त्याच्या तुलनेत राहुल गांधी यांचे भाषणही खूप चर्चेत राहिले. राहुल गांधी यांचा नवा अवतार काल संसदेत पाहायला मिळाला. त्याचे श्रेय त्यांना द्यायलाय पाहिजे. मोदींना आपण अनेकवेळा बोलताना ऐकले आहे. पण, राहुल गांधींना अशाप्रकारे भाषण करताना पहिल्यांदा पाहिले.''

भारतीय क्रिकेट संघ सतत चांगले खेळून विजय मिळवीत असतात. पण कधी बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला तर चर्चा बांगलादेशची होती. तसेच काही सत्तेत असताना बहुमत हे येतच असते. बहुमत नरसिंह राव यांनीही मिळविले होते, त्यावेळी त्यांच्याकडे आकडेही नव्हते. आता भाजपकडे आकडे तरी होते, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT