jail File photo
देश

धक्कादायक! हरयाणातील कोरोना तुरुंगातून १३ कैदी फरार; सर्वजण होते पॉझिटिव्ह

राज्यभर या सर्वांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

रेवाडी : हरयाणाच्या रेवाडी (Haryana-Rewadi) जिल्ह्यातील कोरोना तुरुंगातून (covid jail) शनिवारी रात्री १३ कैदी फरार (13 prisoners escapes) झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वांचा शोध सुरु करण्यात आला आहे. हे सर्व कैदी कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या बराकीत हे कैदी होते त्या बराकीच्या लोखंडी दरवाजाची एक सळई कापून आणि चादरींचा दोरखंड बनवून त्याद्वारे या सर्वांनी तुरुंगाबाहेर धूम ठोकली. सकाळी या कैद्यांच्या मोजणीदरम्यान ही बाब समोर आली. त्यानंतर तुरुंग प्रशासनामध्ये भूकंप झाला. (Shocking 13 prisoners escape from Corona Jail in Haryana Everyone was positive)

रेवाडी जिल्ह्यातील फिदेडी गावात नवा तुरुंग बनवण्यात आला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता फिदेडी तुरुंगाला हप्त्याभरापूर्वी कोविड जेलमध्ये रुपांतरीत करण्यात आलं होतं. या तुरुंगात राज्यातील तुरुंगातील ४५० कोरोनाबाधित कैद्यांना हालवण्यात आलं आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री एकाच बराकीत असलेले १३ कैदी लोखंडी ग्रील कापून बाहेर पडले आणि चादरीचा दोरखंड बनवून तटबंदी ओलांडून फरार झाले. हे फरार झालेले सर्व कैदी गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आलेले होते. रविवारी सकाळी कैद्यांची मोजणी सुरु झाल्यानंतर यातील १३ कैदी फरार झाल्याचं समोर आलं. यानंतर तुरुंग प्रशासनात मोठा भूकंप झाला. पोलिसांची पथकं जिल्हाभर फरार कैद्यांच्या शोधकार्य सुरु केलं आहे. आसपासच्या गावात शोध मोहिम राबवली जात आहे.

या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दणका! विशेष मोहिमेत २ कोटींचा साठा जप्त, १६ जणांना अटक

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT