Marathi Breaking News 
देश

धक्कादायक! PMOचा अधिकारी असल्याचं सांगत मिळवली झेड प्लस सिक्युरिटी, बुलेटप्रूफ कार अन्...

Marathi Breaking News: अनेक बैठकाही घेणाऱ्या या बनावट अधिकाऱ्याचे चक्रावून सोडणारे कारनामे जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात (PMO) उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं सांगत एका ठगानं चक्क झेड प्लस सिक्युरिटी मिळवली तसेच तो बुलेटप्रुफ कारमधून फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे या अधिकाऱ्यानं अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या ठगाला अटक केली आहे. (Shocking Claiming to be PMO official Z Plus security bulletproof car was obtained)

किरणभाई पटेल असं या ठगाचं नाव असून तो मूळचा गुजरातचा आहे. त्यानं आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये आपली पीएचडी झाल्याचं म्हटलं आहे. पटेल हा स्वतःला पीएमओचा अतिरिक्त संचालक असल्याचं सांगत होता.

इतकंच नव्हे त्यानं स्वतःसाठी झेड प्लस सिक्युरिटी देखील मिळवली होती. बलुटप्रुफ एसयुव्ही कारची सुविधा देखील त्याला मिळाली होती. तसेच तो कायम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबत होता.

पण त्याच्या या तामझामचा जम्मू-काश्मीर पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी चौकशी केल्यानंतर पटेल हा फेक अधिकारी असल्याचं समोर आलं. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली. पण या अटकेची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. पण गुरुवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी याचा खुलासा केला.

किरण पटेलच्या पीएचडीची देखील पोलीस उलट तपासणी करत आहेत. पटेल यानं फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता.

याकाळात त्यानं सर्व सरकारी सुविधांचा फायदा मिळवला. त्यानं आपल्या ट्विटरवर या दौऱ्याचे अनेक फोटो देखील शेअर केले होते. त्याच्यासोबत सीआरपीएफचे जवानही दिसत आहेत.

हे ही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, किरण पटेल यानं गुजरातहून जास्तीत जास्त पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आणण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या. दूधपथरी हा भाग टुरिझम स्पॉट बनवण्यासाठी देखील त्यानं चर्चा केली होती.

पण हा फेक अधिकारी असल्याची कुणकुण गुप्तचर यंत्रणांना लागली होती. त्यांनी याबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली.

जसा तो पुन्हा जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT