Jammu and Kashmir Terror Attack esakal
देश

13 दिवसांत बँक मॅनेजरच्या हत्येचा बदला; जम्मू-काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये भरदिवसा बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) भरदिवसा बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. शोपियानमध्ये (Shopian) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ह्या दहशतवाद्यांना मारलंय. तिथं एकूण दोन दहशतवादी मारले गेले आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तौयबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी (Terrorists) एकाचं नाव जान मोहम्मद लोन असं आहे.

विजय कुमार हा राजस्थानमधील (Rajasthan) हनुमानगढचा रहिवासी होता. तो कुलगामच्या मोहनपुरा इथं बँक मॅनेजरच्या पदावर कार्यरत होता. दहशतवाद्यांनी त्याला बँकेत घुसून गोळ्या घातल्या. याआधी मंगळवारी शाळेतील शिक्षिका रजनीबाला यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दरम्यान, काश्मीरमध्ये वाढत्या टार्गेट किलिंगच्या घटना पाहता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिकाही दाखल करण्यात आलीय. या याचिकेत सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांना काश्मीरमधील हिंदूंच्या मृत्यूची दखल घेण्यास सांगितलंय.

तर, 31 मे रोजी कुलगाममध्ये रजनीबाला या महिला शिक्षिकेची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या सांबामधील रहिवासी होत्या. कुलगाममधील गोपालपोरा इथं त्यांची हत्या करण्यात आली होती. रजनी या गोपाळपोरा हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच 12 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या. तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य केलं. रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला. काश्मिरी पंडित राहुल बराच काळ महसूल विभागात कार्यरत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT