Shyam Rangeela|PM Modi Esakal
देश

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Varanasi Lok Sabha Election 2024: मी एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चाहता होतो. तो म्हणाले की, 2016-17 पर्यंत मी भक्त होतो. पण माझ्यावर निर्बंध लादले गेले.

आशुतोष मसगौंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियन श्याम रंगीला या 29 वर्षांच्या तरुणाने 2024 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची घोषणा केली आहे.

श्याम रंगीला आता पीएम मोदींना आव्हान देणार आहेत. श्याम रंगीला याने नुकतेच एक्सवर पोस्ट करत व्हायरल केले की, तो वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहे. कारण कोणता उमेदवार केव्हा उमेदवारी मागे घेईल हे सध्या सांगता येत नाही. (Shyam Rangeela To Fight Against PM Narendra Modi From Varanasi Lok Sabha Election 2024)

आतापर्यंत लोक त्यांच्या पोस्टकडे केवळ गंमत म्हणून पाहत होते. पण आता एका मीडिया हाऊसशी बोलताना त्याने याला दुजोरा दिला आहे.

श्याम रंगीला म्हणाला की, या आठवड्याच्या अखेरीस तो वाराणसीला जाऊन पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवारी दाखल करणार आहे.

लोकशाही जिवंत राहावी यासाठी आपण हे करत असल्याचं कॉमेडियन श्याम रंगीला याने सांगितले. तो म्हणाले की, आजकाल कोण उमेदवारी कधी मागे घेईल हे कोणालाच माहीत नाही. अशा स्थितीत तो निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहे. निवडणुका होतील आणि लोकही मतदान करू शकतील, असा संदेश तो जनतेला देईल.

29 वर्षीय श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीमुळे प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने अनेक कॉमेडी शोमध्येही भाग घेतला आहे.

पीएम मोदींविरोधात निवडणूक लढवल्यास ईडीच्या भीतीच्या प्रश्नावर श्याम रंगीला म्हणाला की, मला त्याची भीती नाही. माझे बँक अकाउंट्स तपासली तर त्यात काहीही सापडणार नाही. मी खरा फकीर आहे, झोळी घेऊन निघून जाईन.

श्याम रंगीला म्हणाला की, मी एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चाहता होतो. तो म्हणाले की, 2016-17 पर्यंत मी भक्त होतो. पण माझ्यावर निर्बंध लादले गेले. मला टीव्ही शोच्या ऑफर्सही येत होत्या. पण पुढे स्क्रिप्ट मंजूर होत नसल्याचे सांगितले आणि मला काढून टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil Video: ''..अन् माझ्यासमोरच कसाब खो-खो हसायला लागला'', विश्वास पाटलांनी सांगितला कोर्टरुममधला अनुभव

Big Breaking : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय अन् टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी जाणार; ६ सामन्यांच्या तारखा जाहीर

Rahul Gandhi on Indore Contaminated Water: "इंदुरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही, विष दिलं गेलं अन् प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत राहिलं"

Kolhapur Election : डमी उमेदवारांचे ४८ अर्ज माघार; आज अखेरचा दिवस, कोल्हापूरमध्ये गर्दी-तणावाची शक्यता

Kolhapur Politics : घारीच्या तोंडावर कोल्हापूरमध्ये पाळत, पाठलाग अन् दबावतंत्र; राजकीय रणधुमाळी शिगेला

SCROLL FOR NEXT