silent round to end Russia Ukraine war esakal
देश

Russia Ukraine War | युध्द थांबावे म्हणून मूक फेरी

विनोद बेदरकर

नाशिक : दोन वर्षांच्या कोरोना (Corona) महामारीने उद्ध्वस्त जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येत असताना, यूक्रेन आणि रशियात (Russia Ukraine War) युद्ध पेटले आहे. युद्धात अण्वस्त्र (Nuclear weapon) वापराचे इशारे दिले जात असल्याने सजीवसृष्टीला धोका निर्माण होईल. त्यामुळे दोन्ही देशातील युध्द त्वरीत थांबावे. यासाठी करंजाळी (ता. पेठ) येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निमूर्लन समितीतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला.

दोन राष्ट्रांत युद्धात परस्परांना अण्वस्त्र वापरण्याच्या धमक्या, यांचा निषेध तसेच जनसामान्य आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकी विचार, सत्य, अहिंसा, शांतता, संयम, मानवता, एकता अशी उच्च कोटीची नीतिमूल्ये रुजवावीत, ती दृढ व्हावीत या उद्देशाने पेठ तालुक्यातील करंजाळी या आदिवासी गावामध्ये महाविद्यालयीन तसेच माध्यमिक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, शिक्षक व महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्त्ये यांनी गावभर मूकफेरी काढली.

दोन राष्ट्रांतील युद्ध तात्काळ थांबवण्यासाठी या दोन्ही देशांवर जागतिक पातळीवरून नैतिक दबाव आणण्यासाठी अनिसतर्फे मोर्चा काढल्याचे सांगण्यात आले. पेठ तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, पंचायत समिती सदस्य पुष्पाताई गवळी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. समीर शिंदे, बुवाबाजी विरोधी संघर्ष जिल्हा सचिव महेंद्र दातरंगे, एम. जे. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. शिंदे, मंगेश आव्हाड के. बी. एच. विद्यालयाचे शिक्षक सुनील मानकर, अनिल कदम, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका निता महाजन आदींच्या नेतृत्वाखाली नव्वदहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी मूकफेरीत फलक घेऊन सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT