देश

Sindhutai Sapkal : पेटत्या चितेवर थापलेली भाकरी खाल्ली अन् चिंधी आयुष्यभर लेकरांसाठी जगली!

सकाळ डिजिटल टीम

एक कापडाची साधी चिंधी.. काय किंमत असेल हो तूमच्या आयुष्यात तीला. तूम्ही तर सधन घरातले. त्यामूळे तूम्हाला तिची गरजही नाही अन् महत्त्वही. पण, रस्त्यावर फाटक्या तुटक्या चिंध्या गोळा करून फाटलेल्या कापडाला ठिगळं जोडणाऱ्याला एका चिंधीचं खूप महत्त्व आहे. ती चिंधी कधी कोणाची आब्रू वाचवते तर कधी कोणाच्या जखमेवर फुंकर घालते. अशीच मायेची उब देणारी एक चिंधी आपल्या समाजात होती. ती म्हणजे चिंधी साठे आणि लग्नानंतरची सिंधू सपकाळ होय.

माईंना चिंधी म्हणण्याच धाडस म्हणाल तर त्यांचे पूर्वीचे नाव हे चिंधी होतं. का तर त्या एक मुलगी म्हणून जन्मल्या म्हणून त्यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं. नाहीतरी त्या काळात मुलींना चिंधीच्या कापडाइतकी तरी किंमत होती का? हा एक अभ्यासाचाच विषय आहे.

सिंधुताईंनी सर्वांच पालनपोषण केलं. अनाथांना त्यांनी आधार दिला. त्यांच्या या कामासाठी त्यांना पद्मश्रीही मिळाला, असे असले तरीही त्यांचा राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तो इतका खडतर होता की त्याचा विचारही आपण कोणी करू शकत नाही. माईंची आज पहिलीच पुण्यतिथी. त्यांच्या या प्रवासाबद्दलचा हा एक दृष्टीक्षेप.

सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणतात. माईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. माई मुळच्या विदर्भातल्या, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वाळण्याचं काम करायचे. मुलगी झाली म्हणून, त्यांचे नाव चिंधी ठेवले गेले. बुद्धीने हुशार असलात तरी त्यांना शालेय शिक्षण घेता आलं नाही. असे असले तरी त्या शाळेबाहेर उभ्या राहून जे काही कानावर पडेल त्यातून त्यांना तोडके मोडके मराठी शिकता आले.

वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी माईंचा विवाह ३० वर्षाच्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. गुरासारखे राबण्यासाठीच त्याकाळात लग्न केली जायची. घराला वारस देणं हे तर त्यांच आद्य कर्तव्य मानलं जायचं.

घरी प्रचंड सासुरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना. त्यांनी सावकारी विरोधात जीवनातील पहिला लढा दिला. गुर राखण्याबदल्यात त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही. म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली.

बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर याची जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली. गावक-यांना माईंचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी, माईंच्या पोटातील मूल आपल असल्याच खोटा आळ त्याने घेतला.

श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. दगडाने ठेचून त्यांनी अर्धमेल्या अवस्थेत नाळ तोडली. माईंच्या तोंडून हा प्रसंग अनेकवेळा ऐकायला मिळाला. तेव्हा प्रत्येकाच्याच अंगावर शहारे आले असतील.

या प्रकारानंतर माई गावातून बाहेर पडल्या. माहेरी गेल्या पण तिथेही कोणी त्यांना आपलंस केलं नाही. पोट भरण्यसाठी माईंना भिक मागावी लागली. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. एका रात्री एक मृतदेह आला.त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले. भाकरी थापली आणि चितेवरच्या निखा-यावर भाजली आणि पोटाची भूक शांत केली.

निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि त्यांनी अनेक लेकरांना आपलंस केलं. गेली 40 वर्षं त्या सामाजिक कार्य करत होत्या. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.. त्यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित “मी सिंधुताई सपकाळ” या चित्रपट दिखील आलेला. या चित्रपटाद्वारे सर्वांपर्यंत त्यांचा संघर्ष पोहोचला होता. अनाथ बालकांसह महिलांसाठी जागतिक पातळीवर काम करता यावे, या हेतूने त्यांनी ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’ या संस्थेची धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी केली. 

महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर त्यासाठी मरावं लागतं…! त्यांच  हे वाक्य हे आजही अनेकांना आठवतं. वयाची ४० वर्ष माईंनी समाजासाठी दिलीत. अशा या माईंचे ४ जानेवारी २०२२ मध्ये पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT