Sippy Sidhu Murder Case
Sippy Sidhu Murder Case esakal
देश

सिप्पी सिध्दू हत्याकांडात सीबीआयची मोठी कारवाई; न्यायाधीशांच्या मुलीला अटक

सकाळ डिजिटल टीम

मुख्य न्यायाधीशांच्या मुलीला सिप्पी सिद्धूच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय.

Sippy Sidhu Murder Case : राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आणि वकील सुखमनप्रीत सिंह उर्फ ​​सिप्पी सिद्धूच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं कारवाई केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश सबिना सिंह (Sabina Singh) यांची मुलगी कल्याणी सिंह (Kalyani Singh) हिला सिप्पी सिद्धूच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय.

20 सप्टेंबर 2015 रोजी सिप्पी सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. चंदीगडातील (Chandigarh) सेक्टर 27 मधील एका उद्यानात त्याचा मृतदेह सापडला होता. दरम्यान, सीबीआयनं आधी कल्याणीला चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीदरम्यान कल्याणी सिंहचा या हत्येशी संबंध असल्याचं समोर आलं, त्यामुळं सीबीआयनं तिला अटक करून कोर्टात (CBI Court) हजर केलं. न्यायालयानं कल्याणीला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलीय.

या घटनेत 12 बोअरची बंदूक वापरण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्याच्यातून चार गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. चंदीगड पोलिसांनी (Chandigarh Police) सेक्टर 26 पोलीस ठाण्यात 35 वर्षीय सिद्धूच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सिद्धू हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एसएस सिद्धू यांचे नातू होते. जानेवारी 2016 मध्ये सिद्धूच्या हत्येचं प्रकरण सीबीआयकडं हस्तांतरित करण्यात आलं, त्यानंतर तपास संस्थेनं एप्रिलमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या हत्येमध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या (Himachal Pradesh High Court) न्यायमूर्तींची मुलगी कल्याणीची कथित भूमिका तपासादरम्यान उघडकीस आली होती. अधिक माहिती मिळवण्यासाठी सप्टेंबर 2016 मध्ये सीबीआयनं हत्या करणाऱ्यांना 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

सीबीआयनं वर्तमानपत्रात जाहिरात दिली

सीबीआयनं वृत्तपत्रात एक जाहिरातही दिली होती, ज्यामध्ये हत्येच्या वेळी एक महिला सिप्पीच्या मारेकऱ्यासोबत होती. त्या महिलेनं पुढं येऊन आपण निर्दोष असल्याचं सांगून आमच्याशी संपर्क साधावा. तिला ही शेवटची संधी असेल, अन्यथा तिचाही या गुन्ह्यात सहभाग होता, असं मानलं जाईल. ही जाहिरात दिली गेली. पण, जेव्हा काहीही निष्पन्न झालं नाही तेव्हा डिसेंबर 2021 मध्ये सीबीआयनं बक्षिसाची रक्कम दुप्पट करून 10 लाख रुपये केली. या जाहिरातीत म्हटलं होतं की, सामान्य जनतेतील कोणाकडं हत्येबाबत विश्वासार्ह माहिती किंवा संबंधित तथ्य असल्यास त्यांनी पुढं यावं. त्यानंतरही निकाल लागला नाही.

कारमध्ये सापडला मृतदेह

या प्रकरणी सिद्धूच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं की, "रविवारी संध्याकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडताना त्यानं सेक्टर-२६ मध्ये एका मित्राला भेटायला जात असल्याचं सांगितलं. यानंतर त्याचा फोन आऊट ऑफ कव्हरेज होता. त्यानंतर आम्हाला पोलिसांनी बोलावलं. पोलिसांना सिद्धूची ऑप्ट्रा कार (CH04H-0032) मृतदेहापासून सुमारे 200 मीटर अंतरावर सापडली होती.

2020 मध्ये सीबीआयनं कोर्टात 'अनट्रेसेबल रिपोर्ट' देखील दाखल केला होता. कारण, यामुळं सिप्पी सिद्धूला संपवण्यासाठी एका महिलेच्या भूमिकेवर शंका निर्माण झालीय. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तपासात हळूहळू सुगावा मिळू लागला आणि नंतर कल्याणी सिंहला अटक केली गेली. आता तिच्या अटकेनंतर सीबीआय हे गुढ उकलण्यास उत्सुक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तोंदलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT