small child lifted the tractor with his hands esakal
देश

Viral Video : ट्रॅक्टरचं तोंड उचलत लोकांची बोलती बंद करणारा बाल 'शक्तीमान'

आजूबाजूचे लोक बघतच राहिले

सकाळ वृत्तसेवा

त्या मुलाची ताकद पाहण्यासाठी आजूबाजूला उभे असलेले लोक आश्चर्यच झाले.

सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या हाताची ताकद दाखवून सर्वांना चकित करताना दिसतोय. त्या मुलाची ताकद पाहण्यासाठी आजूबाजूला उभे असलेले लोक आश्चर्यच झाले. हा मुलगा आपल्या हातांनी जड ट्रॅक्टर (Tractor) उचलतोय. सगळ्यात आश्चर्यायाची गोष्ट म्हणजे त्या ट्रॅक्टरमध्ये काही मुलं बसलेली आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच खूप व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओ पाहून लोक त्या मुलाला 'बाहुबली' असं म्हणत आहेत. युजर्स हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करतानाही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक लहान मुलगा समोरच्या बाजूने ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न करतो.

हा मुलगा पुढच्या चाकांच्या बाजूने ट्रॅक्टर उचलत आहे. आपण पाहू शकता की ट्रॅक्टरवर बरीच मुले बसलेली आहेत. मुले बसल्यामुळे ट्रॅक्टर उचलणं इतकं सोपं नव्हतं. पण तो मुलगा ट्रॅक्टरच्या पुढे जाऊन त्याला उचलून घेतोय. ट्रॅक्टरही तो जरा जवळ करतो. सोशल मीडिया यूजर्स या चिमुकल्याला असं करताना पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्येकजण मुलाचे कौतुक करीत आहे. मात्र काही लोक तर हा व्हिडिओ फेक असल्याचंही सांगत आहेत.

याशिवाय ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला लोड असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. ज्यामुळे ते उचलणं सोपं जातं. हा व्हिडिओ आतापर्यंत 65 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 40 लाखांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. या व्हिडिओवर बहुतांश युजर्स आश्चर्यकारक इमोजीसह कमेंट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होणार

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT