Smriti Irani criticizes Telangana CM K. Chandrasekhar Rao  Smriti Irani criticizes Telangana CM K. Chandrasekhar Rao
देश

स्मृती इराणी म्हणाल्या, केसीआर यांनी संविधानाची खिल्ली उडवली

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी कोणत्या व्यक्तीचा नाही तर एका संस्थेचा अपमान केला आहे. त्यांनी संविधानाची खिल्ली उडवली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी चंद्रशेखर राव यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत न केल्याबद्दल टीका केली आहे. (Smriti Irani criticizes Telangana CM K. Chandrasekhar Rao)

शनिवारी (ता. २) पंतप्रधान मोदी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी हैदराबादला पोहोचले. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जायला हवे होते. मात्र, केसीआर यांनी तसे केले नाही. केवळ त्यांच्या एका मंत्र्याला पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी पाठवले. त्याचवेळी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर मंत्र्यांसह हैदराबाद विमानतळावर पोहोचले होते.

तत्पूर्वी, स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घडलेला प्रकार सांगितला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बंगाल, केरळ आणि जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच भाजपच्या कनेक्टिंग राजकारणावर अध्यक्षांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या गरिबांच्या कल्याणकारी योजनांचीही गणना केली.

आमच्या सरकारने आठ वर्षांत महिला आणि तरुणांच्या भल्यासाठी काम केले आहे. याशिवाय जन धन योजनेद्वारे देशातील ४५ कोटी लोकांना आर्थिक आधार मिळाला आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) विरोध करताना विरोधी पक्षांनी देशाचा विरोध सुरू केला आहे, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जर राज्यात आले तर प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्या स्वागतासाठी जावे लागते. ही परंपरा खंडित करणे योग्य नाही. आपण पंतप्रधानांना आदर दिला पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान आहेत, असे भाजपचे आमदार एन रामचंद्रन राव म्हणाले.

सहकारी संघराज्य हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी (K. Chandrasekhar Rao) पुन्हा एकदा प्रोटोकॉलचे उल्लंघन करून पंतप्रधानांचा अपमान केला आहे, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT