Smruti Irani  Esakal
देश

Smruti Irani on Manipur Violence:स्मृती इराणींचा खळबळजनक दावा, मणिपूरमधील हिंसेला राहुल गांधी जबाबदार

Smruti Irani in Parliament: स्मृती इराणी यांनी संसदेत बोलताना मणिपूरमधील घटनेसाठी राहुल गांधी यांना जबाबदार धरलंय. जे कॉंग्रेस खासदार हिंसाचारामुळे केंद्राला बोट दाखवताय त्यांची बिहार आणि छत्तीसगडमधील घटनेवर बोलण्याची हिंमत आहे का? असा सवाल त्यांनी कॉंग्रेसच्या खासदार यमी याग्निक यांना केला.

सकाळ डिजिटल टीम

Smruti Irani blamed Rahul Gandhi:केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बुधवारी (दि.) त्यांना मणिपुर मुद्द्यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर भडकल्या. इराणी यांनी आरोप लावला की कॉंग्रेस मणिपुर हिंसाचारातील तथ्य लपवत आहे. त्यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर आरोप लावला की मणिपूरमध्ये लागलेली आग राहुल गांधी यांनी लावली आहे.

त्यांनी हा आरोप संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला केला. कॉंग्रेसच्या खासदार यमी याग्निक यांनी संसदेत विचारलं की केंद्र सरकारमधील कोणत्याही महिला मंत्री या मुद्द्यावर बोलायला तयार आहेत का?

प्रश्नोत्तराच्या सत्रात सध्याच्या परिस्थितीवर प्रश्न करत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून माहिती करुन घेण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या मंत्री मंडळातील त्यांच्या काही सहकारी महिला मंत्री मणिपूर मुद्द्यावर केव्हा बोलणार आहेत?

यमी याग्निक यांच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी यांना राग अनावर झाला. त्या म्हणाल्या की या गोष्टीवर त्यांना प्रचंड आक्षेप आहे. त्या म्हणाल्या की फक्त महिला मंत्री नव्हे तर महिला राजकीय नेत्यांनी मणिपूर बरोबरच छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमध्ये घडणाऱ्या घटनांवरही त्यांनी लक्ष केंद्रीत करायला पाहिजे. स्मृती इराणी यांनी यमी याग्निक यांना प्रश्न केला की या राज्यांमध्ये घडलेल्या घटनांवर बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे का ?

केंद्रीय मंत्री म्हणाल्या की,"छत्तीसगडमध्ये झालेल्या घटनांवर बोलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का ? राजस्थानमध्ये घडलेल्या घटनांवर बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का ? बिहारवर बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का ? लाल डायरीवर बोलण्याची तुमच्यात ताकद आहे का ?"

यापुढे त्या म्हणाल्या की,"या गोष्टीवर बोलण्याची हिम्मत कोणाची कधी होईल की एक कॉंग्रेस नेता मणिपूरमध्ये जाताच मणिपूर जळू लागलं. हे सांगण्याची हिंमत कधी होणार की राहुल गांधी यांनी मणिपूर आगेत ढकलंल"

स्मृती इराणी म्हणाल्या की,"तुमच्यात ताकद आहे का की कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये झालेल्या बलात्कारांच्या मुद्द्यावर बोलण्याची कोणाची हिम्मत आहे का ?" त्यानंतर इराणींनी कॉंग्रेस खासदार यमी याग्निक यांना इशारा दिला की जर त्यांच्यात या मुद्द्यांवर बोलण्याची हिंमत नसेल तर त्यांनी सरकारवर अनावश्यक दबाव नाही टाकला पाहिजे.

याआधी लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले होते की केंद्र सरकार मणिपूर मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे आणि त्यांनी दोन्ही सभागृहाच्या विरोधक नेत्यांना पत्रही लिहिलंय. त्यांनी विरोधक नेत्यांना परिस्थिती अनुकूल करण्यासाठी आवाहन केलं, जेणेकरुन या मुद्द्यावर रचनात्मक पद्धतीने चर्चा होऊ शकेल.(Letest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT