Raosaheb Danave 
देश

Snow Fall at Shrinagar: दानवेंना पडली श्रीनगरची भुरळ! दाजी म्हणाले, इकडं एकदा याचं

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या यंदाच्या मोसमातील छान बर्फवृष्टी होत असून इथलं वातावरण पर्यटकांना भुरळ घालणार असं बनलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या यंदाच्या मोसमातील छान बर्फवृष्टी होत असून इथलं वातावरण पर्यटकांना भुरळ घालणार असं बनलं आहे. या वातावरणाच्या प्रेमात आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील पडले आहेत. इथल्या बर्फवृष्टीमध्ये गुडूप झालेल्या श्रीनगर रेल्वे स्टेशनचे काही फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टची सध्या खूपच चर्चा आहे. (Snow Fall at Shrinagar Raosaheb Danave fell in love with Srinagar)

जम्मू-कश्मीरच्या बनिहालपासून बडगामपर्यंतचा काश्मीर खोऱ्याचा भाग जणू बर्फाच्या चादरीत लपेटला गेल्यासारखा भासतो आहे. या बर्फाच्या चादरीतून रेल्वे जात असल्याचा एक व्हिडिओ देखील दानवे यांनी ट्विट केला आहे.

हे ही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

दरम्यान, दानवे यांनी ट्विट केलेले फोटो इतके भुरळ घालणारे आहेत की, त्यामुळं तुम्हालाही श्रीनगरला भेट देण्याची इच्छा निर्माण होईल. या मोसमातील बर्फवृष्टीमुळं श्रीनगरचं रेल्वे स्टेशनच बर्फामध्ये हरवून गेलं आहे. त्याचबरोबर रेल्वे रुळही बर्फाच्या चादरीत गुडूप झाले आहेत. इथल्या सुर्योदही अत्यंत सुंदर दिसत आहे.

दानवेंनी रेल्वे मंत्रालयाला हे फोटो टॅग केले असून त्यांच्या या ट्विटवर अनेक युजर्सनं सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना काश्मीरचं हे दृश्य खूपच भावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT