India government Z security to owaisi  eSakal
देश

यूपीतील गोळीबारामागे धर्मसंसद? वाचा काय आहे ओवैसींचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या गदारोळात ‘एमआयएम’ खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर केंद्र सरकारने त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतील, मात्र ओवैसी यांनी ही सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे आपल्या हल्ल्यामागे अनेक जणांचा हात असल्याचा दावा करत ओवैसींनी वादग्रस्त ठरलेल्या धर्मसंसदेवर संशय व्यक्त केला आहे. (AIMIM MP Asaduddin Owaisi over attack on his vehicle in UP)

असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय की, आपण १९९४ पासून राजकारणात असून आजपर्यंत कधीच सुरक्षा घेतलेली नाही. यापुढेही घेणार नाही. माझे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच गोळाबाराच्या घटनेची केंद्रीय निवडणूक आयोगाने निपक्ष चौकशी करावी.

पुढे ते म्हणाले की, मी 2015 मध्ये संसदेत सर्व धर्मांसाठी डिरॅडीकलायझेशन गट (कट्टरतावाद कमी करणारे गट)स्थापन करण्यास सांगितले होते. कट्टरतावादाने महात्मा गांधी आणि आपले दोन माजी पंतप्रधान आणि इतर अनेक नेत्यांची हत्या झाली आहे. माझ्या हल्ल्यामागे अनेक लोक आहेत. एक कथित धर्मसंसद अलिकडेच प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी अनेक जणांनी मला मारण्यात यावं या प्रकारची वक्तव्ये केली होती. मग सरकार त्यांच्या दिशेने का तपासाच्या हालचाली करत नाहीये? असा सवाल त्यांनी केल आहे.

याआधी ओवेसी यांच्यावर दिल्लीतील अशोक मार्गावरील निवासस्थानी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, सध्या उत्तरप्रदेशातील प्रचारात सक्रिय असलेल्या ओवेसी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शुक्रवारी हापूड टोल प्लाजा येथे गोळीबार झाला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. स्वतः ओवेसी यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिल्याने खळबळ निर्माण झाली होती. हापुडच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते, सचिन आणि शुभम या दोघांना न्यायालयामध्ये सादर केले असता त्यांना चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. ओवेसी यांनी आज संसद भवनामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणातील हल्लेखोर सचिन हा नोएडाच्या बादलपूर येथील रहिवासी असून त्याच्यावर याआधी देखील एका गुन्ह्याची नोंद आहे.

सुरक्षेचे स्वरूप

केंद्र सरकारने ओवेसी यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. यात ४ ते ६ एनएसजी कमांडो आणि पोलिस कर्मचारी असे एकूण २२ जण चोवीस तास त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहतील. त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी देखील सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याअंतर्गत रस्त्याने प्रवास करताना त्यांच्या समवेत एस्कॉर्ट वाहन आणि पायलट वाहन देखील देण्यात येईल. ओवेसी यांनी मात्र ही सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

Sangola FDA Raid: सांगोल्यात एफडीएची मोठी कारवाई! ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त; १५ लाखांचा साठा जागेवरच नष्ट

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

SCROLL FOR NEXT