soap cake found in samosa of igmc canteen at shimla photo viral 
देश

सोमोसा खाताना डॉक्टरांच्या तोडांतून आला फेस; कारण...

वृत्तसंस्था

सिमला (हिमाचल प्रदेश): एक डॉक्टर गरमागरम सामोसा खात होते. पण, अचानक त्यांच्या तोडांमधून फेस येऊ लागला. शिवाय, सोमोश्याची चवही वेगळी लागली. यामुळे सामोसा उघडून पाहिल्यानंतर त्यामुध्ये चक्क साबणाची वडी आढळून आली.

इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या (IGMC) कँटीनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सामोस्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयजीएमसीच्या कँटिनमध्ये डॉक्टर नाष्टा करण्यासाठी गेले होते. कॅंटीनमध्ये गरम सामोसे असल्यामुळे डॉक्टरांनी सामोसे खाण्यासाठी घेतले. एक डॉक्टर सामोसा खात असताना त्यांना वेगळीच चव लागायला लागली. त्यांनी समोसा उघडून बघितला तर त्यामध्ये चक्क साबणाची वडीच आढळली. यानंतर डॉक्टरांनी आयजीएमसीचे मेडिकल सुप्रिटेंडेंटकडे तक्रार केली.

डॉक्टरांनी सांगितले की, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या मेडिकलमध्ये अनेकदा अस्वच्छता असते. यापूर्वीही अस्वच्छतेबाबतचे प्रकार अनेकदा घडले आहेत. एकदा तर जेवणामध्ये झूरळ आढळले होते. चहामध्ये कचरा आढळून आला होता. पण, तक्रार केल्यानंतरही बदल घडलेला दिसत नाही. यावेळी तरी कँटिन चालकांवर कडक कारवाई व्हावी. देशात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असून, अशाप्रकारे खाद्यपदार्थ बनवताना हलगर्जीपणा केला जात असेल तर हा गंभीर प्रकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT