soldier could not attend sons funeral due to lockdown 
देश

जवानाने मोबाईलवरून घेतले चिमुकल्याचे अंत्यदर्शन...

वृत्तसंस्था

दंतेवाडा (छत्तीसगड) : देशात लॉकडाऊन असल्यामुळे चिमुकल्याच्या अंत्यदर्शनाला पोहचता येणार नसल्यामुळे जवानाने व्हिडिओ कॉलिंगवरून चिमुकल्याचे अंत्यदर्शन घेत त्याची माफी मागितली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.

देशाच्या सीमेवर उभे राहून मातृभूमीची सेवा करणाऱया जवानाला आपल्या चिमुकल्याच्या अंत्ययात्रेला जाता न आल्याची घटना समोर आली आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे जवान वेळेत गावात पोहचू शकणार नव्हता. यामुळे जवानाने मोबाईलवरून मुलाचे अंत्यदर्शन घेत त्याची माफी मागितली. वडिलांचा जीव असूनही लॉकडाऊनमुळे अंत्ययात्रेला येता येत नसल्याचे मोठे  दु:ख होते. राजकुमार नेताम असे जवानाचे नाव आहे.

छत्तीसगडमधील घोटपाल गावातील रहिवासी असलेले राजकुमार नेताम हे नेपाळच्या सीमेवर कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचा एक वर्षांचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याची तब्येत अचानक खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे ते येऊ शकणार नसल्याने त्यांनी व्हिडीओ कॉलकरून मुलाच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घेतले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांचे अश्रू पाहून उपस्थितांचेही अश्रूंचे बांध फुटले.

राजकुमार यांनी आपल्या मुलाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना माफी मागितली. मला व्हिडीओ कॉलमध्येही रेंजचा खूप प्रॉब्लेम येत होता त्यामुळे फक्त मी त्याच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊ शकलो. देशाचं संरक्षण करणे माझं पहिले कर्तव्य आहे. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे अंत्ययात्रेला जाणे शक्य झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT