son kills father for snoring in uttar pradesh 
देश

झोपेत असताना मोठ्याने घोरू नका म्हणाला अन्...

वृत्तसंस्था

पीलीभीत (उत्तर प्रदेश): वडील दिवसभर कष्ट केल्यामुळे गाढ झोपले होते. झोपेत असताना ते घोरू लागले. यामुळे वडिलांना त्याने झोपेतून उठवले आणि घोरू नका म्हणून सांगितले. वडील पुन्हा झोपले आणि घोरू लागले. यामुळे मुलाने भांडण काढत वडिलांना बेदम मारहाण केली. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला आहे.

पीलीभीत जिल्ह्यातील सौधा या गावमध्ये वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा घटनास्थळावरून पळून गेला आहे. याबाबत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामस्वरूप (वय 65) हे पत्नी आणि दोन मुलांसह गावात राहात आहेत. नवीन आणि मुकेश ही दोन मुलांची नावे. लहान मुलगा मुकेश हा आईसोबत एका कार्यक्रमाला गेला होता. घरी रामस्वरूप आणि मुलगा नवीन हे दोघेच होते. रामस्वरूप यांनी मंगळवारी (ता. 11) दिवसभर काम केले आणि रात्री झोपी गेले. झोपेत असताना ते घोरत होते. यामुळे मुलाने त्यांना झोपेतून उठवले आणि घोरू नका म्हणून सांगितले. पण, पुन्हा घोरू लागल्यामुळे नवीनने त्यांना उठवले आणि भांडू लागले. नवीने वडिलांना काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. डोक्यात काठीचा फटका लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. रामस्वरूप यांना शेजारच्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर नवीन फरार झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी रामस्वरूप यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नवीनचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT