Sonia Gandhi Marathi News Sonia Gandhi Marathi News
देश

Rashtrapatni Remark : सोनिया गांधींच्या प्रश्नाला रमा देवींचे उत्तर; तुमची...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते अधीर रंजन चौधरी यांच्या ‘राष्ट्रपत्नी’ या वक्तव्यावरून लोकसभेत बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. अशात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप खासदार रमा देवी यांच्याशी संपर्क साधला. चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या टिप्पणी प्रकरणात माझे नाव का ओढले जात आहे, असा प्रश्न सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केला. त्यावर रमा देवी (Rama Devi) यांनी काय उत्तर दिले हे जाणून घेऊया...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अधीर रंजन चौधरी यांनी ‘राष्ट्रपत्नी’ असे संबोधले. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. सोनिया गांधी बाहेर येत असताना भाजप खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. सोनिया गांधी भाजप खासदार रमा देवी यांच्याजवळ बोलण्यासाठी गेल्या. दरम्यान, स्मृती इराणी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सोनिया गांधी (Sonia Gandhi) भडकल्या.

सोनिया गांधी यांनी रमा देवी (Rama Devi) यांना ‘माझी चूक काय?’ असा प्रश्न केला. त्यांच्या या प्रश्नावर रमा देवी यांनी ‘तुमची ही चूक आहे की चौधरी यांची लोकसभेतील काँग्रेस नेते म्हणून निवड केली’ असे उत्तर दिले.

रमा देवी आणि सोनिया गांधी यांच्यातील संवादादरम्यान स्मृती इराणी (smriti Irani) पोहोचल्या आणि सोनिया गांधींना म्हणाल्या, ‘मॅम, तुमची काय करू शकते. तुमचे नाव मी घेतले आहे’ असे म्हटले होते. तेव्हा सोनिया गांधी ‘माझ्याशी बोलू नको’ असे म्हणाल्या. आधी सोनिया गांधी यांनी स्मृती इराणींकडे दुर्लक्ष केले होते. नंतर त्या स्मृती इराणींशी रागाने बोलताना दिसल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि तृणमूल काँग्रेसच्या अपरूपा पोद्दार सोनिया गांधी यांना कोषागार खंडपीठापासून दूर नेताना दिसल्या. कारण, भाजप सदस्य रमा देवी आणि त्यांच्याभोवती जमले होते.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या निदर्शनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले होते. यामुळे गदारोळ झाला. भाजपने याला मुद्दा बनवला आहे. स्मृती इराणी संसदेत या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या होत्या. अधीर रंजन चौधरी यांनी सोनिया गांधी यांच्या परवानगीनेच असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Time Table : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोप

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सीबीआय अधिकाऱ्यांच्या १२ सदस्यांच्या पथकाने चेंगराचेंगरीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

SCROLL FOR NEXT