congress president sonia gandhi  admitted to sir ganga ram hospital
congress president sonia gandhi admitted to sir ganga ram hospital  Sakal
देश

नाकातून रक्त आल्यामुळं सोनिया गांधी ऍडमिट? काँग्रेसकडून स्पष्टीकरण

धनश्री ओतारी

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (congress president sonia gandhi) यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोरोना झाला होता. दरम्यान, कॉंग्रेसने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. सोनिया गांधी याच्या नाकातून रक्त वाहू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कॉंग्रेस नेता जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गानंतर 12 जूनला सोनिया गांधी यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सोनिया गांधी यांना काल श्वास घेण्यास त्रास होत होता. नंतर त्यांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. अशी माहिती जयराम यांनी दिली. तसेच, कोरोनानंतर त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आणखी काही समस्या उद्भवल्या आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. असही जयराम यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली होती. त्यांना काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचं समन्स

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीनं सांगितलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसनं हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT