Sonia Gandhi and Prashant Kishor  Sonia Gandhi and Prashant Kishor
देश

सोनिया गांधींनी घेतली बैठक; प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावाबाबत असंतोष

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी सोमवारी निवडक सहकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा प्रस्ताव आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या गेम प्लॅनवर चर्चा केली. यावेळी प्रशांत किशोर यांनी एक प्रस्ताव आणला ज्याअंतर्गत काँग्रेस ३७० जागांवर निवडणूक लढवू शकते. काही राज्यांमधील जागांवर मित्र पक्षांसोबत युती करू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी सुचवले आहे की, काँग्रेसने (congress) यूपी, बिहार आणि ओडिशामध्ये एकट्याने लढावे, तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात युती करावी. याला राहुल गांधीही सहमत आहेत. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी काँग्रेसकडे २ मेपर्यंत वेळ असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या १० जनपथ रोडवरील निवासस्थानी झालेल्या बैठकीत सरचिटणीस प्रियांका गांधी, पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, रणदीप सिंग सुरजेवाला आणि अंबिका सोनी उपस्थित होते. मात्र, राज्यांमध्ये काँग्रेसचे थेट प्रतिस्पर्धी असलेल्या आणि देशातील सर्वांत जुन्या पक्षाशी चांगले संबंध नसलेल्या नेत्यांशी हातमिळवणी करीत असल्याने प्रशांत किशोर (prashant kishor) आणि त्यांच्या प्रस्तावाबाबत काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

या नेत्यांमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे. प्रशांत यांच्या आयपीएसी संस्थेने ममता आणि जगनमोहन यांची निवडणूक प्रचार मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे.

गांधी घराण्याकडे मोर्चा

प्रशांत किशोर यांनी गेल्या आठवड्यात गांधी कुटुंबासोबत भेट केल्यानंतर त्यांची काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आला होता. परंतु, या मुद्द्यावर अंतिम करार होऊ शकला नाही. मात्र, प्रशांत किशोर (Sonia Gandhi) यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी गांधी घराण्याकडे मोर्चा वळवल्याचे सूत्रांकडून समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT