Sonia Gandhi is not sitting quietly Sonia Gandhi is not sitting quietly
देश

सोनिया गांधी शांत बसलेल्या नाही; ॲक्शन मोडमध्ये येत केले ‘हे’ बदल

सकाळ डिजिटल टीम

प्रशांत किशोर यांच्याशी बोलणी अयशस्वी झाल्यापासून काँग्रेसला कायम स्थितीत राहायचे आहे. ते बदलासाठी तयार नाहीत असा आरोप होत आहे. मात्र, हायकमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi) काही राज्यांमध्ये बदल केले आहेत. याशिवाय पंजाबमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष निवडला आहे. तसेच सुनील जाखड, केव्ही थॉमस या नेत्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली आहे. यामुळे सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. (Sonia Gandhi is not sitting quietly)

मंगळवारी सायंकाळी काँग्रेस (congress) हायकमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी हिमाचल प्रदेशमध्ये प्रतिभा सिंह यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांच्यासह चार कार्याध्यक्षांची नावेही जाहीर केली आहेत. यावरून सोनिया गांधी चूप असल्याचे दिसत असले तरी शांत बसल्या नसल्याचे दिसून येत आहे. या घेतलेल्या निर्णयांचा पक्षाला किती फायदा होतो आता हेच पाहणे बाकी आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस संपल्याचे बोलले जात आहे. यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हरयाणात गटबाजी संपवण्याचा प्रयत्न

हरयाणात अनेक दिवसांपासून सुरू असलेली गटबाजी संपवण्याचा प्रयत्न करीत उदयभान यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. उदयभान हे भूपिंदरसिंग हुड्डा यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि ते दलित समाजातील आहेत. जाट समाज आणि दलितांमध्ये संदेश देण्यासाठी त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

मध्य प्रदेशात घेतला राजीनामा

मध्य प्रदेशात कमलनाथ यांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यांच्या जागी गोविंद सिंग यांच्याकडे विधानसभेची कमान सोपवण्यात आली आहे. कमलनाथ यांच्याबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, त्यांच्यापुढे कोणीही यावे असे त्यांना वाटत नाही. याशिवाय प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते ही दोन्ही पदे त्यांच्याकडे होती. अशा स्थितीत त्यांना एका पदापुरते मर्यादित करून हायकमांडने निश्चितच बदलाचा संदेश दिला आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलणार?

मे महिन्यात होणाऱ्या चिंतन शिबिरानंतर राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनाच प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्री म्हणून बढती मिळू शकते, असे बोलले जात आहे. सचिन पायलट यांनी यापूर्वी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी झालेल्या भेटीतूनही याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

पंजाब व केरळमध्ये नेत्यांची हकालपट्टी

एकीकडे काँग्रेस (congress) हायकमांड (Sonia Gandhi) राज्यातील घटक बदलाबाबत सक्रिय असल्याचे दिसत असतानाच शिस्तीची कारवाईही करीत असल्याचे दिसत आहे. पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची पक्षाच्या सर्व पदांवरून हकालपट्टी केली आहे. याशिवाय केरळचे ज्येष्ठ नेते केव्ही थॉमस यांच्यावरही हीच कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसने कितीही मोठा नेता असला तरी पक्षाच्या विरोधात गेल्यास कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT