Sonia Gandhi Smriti Irani Marathi News Sonia Gandhi Smriti Irani Marathi News
देश

Don't Talk To Me; संसदेत स्मृती इराणींवर सोनिया गांधी संतापल्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अधीर रंजन चौधरी यांनी ‘राष्ट्रपत्नी’ संबोधल्याने झालेला गोंधळ थांबत नाही आहे. सभागृहाचे कामकाज तहकूब करून सोनिया गांधी बाहेर येत असताना भाजप खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. स्मृती इराणी बोलल्या असता सोनिया गांधी (Sonia Gandhi) भडकल्या. मला तुमच्याशी बोलायचे नाही, सोनिया गांधी म्हणाल्या. प्रत्युत्तरात स्मृती इराणीही (Smriti Irani) काही बोलल्या. यामुळे सुमारे दोन मिनिटे दोघांमध्ये वादावादी झाली. (Sonia Gandhi Smriti Irani Marathi News)

‘राष्ट्रपत्नी’वरून भाजपकडून (BJP) राज्यसभा व लोकसभेत बराच गदारोळ झाला होता. यानंतर सभागृहाबाहेर सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि स्मृती इराणी यांच्यात जोरदार वादावादी झाली. सोनिया गांधी यांनी भाजप खासदार रमा देवी यांना अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली असे सांगितले. दरम्यान, स्मृती इराणी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सोनिया गांधी भडकल्या.

संसदेत विरोधक व सत्ताधारी यांच्यात कटुता वाढली असून, दुरावा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मृती इराणी संसदेतही या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या होत्या. अधीर रंजन चौधरी यांनी सोनिया गांधी यांच्या परवानगीनेच असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी स्वतः देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या.

आज लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी असभ्य आणि अपमानास्पद वर्तन केले. स्पीकर याचा निषेध करणार का? नियम फक्त विरोधकांसाठी आहेत का, असा प्रश्न काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

गदारोळ का झाला?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या निदर्शनादरम्यान राष्ट्रपतींसाठी हा शब्द वापरला होता. भाजपने आता हा मुद्दा बनवला आहे. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने यासाठी देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT