Om Birla, Eknath Shinde Bhawana Gawali Rahul Shewale 
देश

राहुल शेवाळे गटनेतेपदी नियुक्त; लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एकनाथ शिंदे समर्थक खासदार गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. आज एकनाथ शिंदे समर्थक खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेऊन नवीन गटनेत्याच्या नियुक्तीबाबत पत्र दिलं होतं. (Shivsena MP news in Marathi)

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे १२ खासदारांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा केली. तसेच आपण अजुनही एनडीएचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यातच आता शिवसेनेच्या लोकसभेतील एकनाथ शिंदे गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिरवा कंदील दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची सभागृहात पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली होती. त्यानुसार लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आता राहुल शेवाळे राहणार असून प्रतोद म्हणून भावना गवळी कायम राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पुन्हा पोलिस आणि आंदोलक समोरासमोर

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT