SpiceJet Boeing 737 Flight’s Windshield Found Cracked Before Takeoff Lands Safely At Mumbai
SpiceJet Boeing 737 Flight’s Windshield Found Cracked Before Takeoff Lands Safely At Mumbai  
देश

Spicejet विमानाच्या विंडशील्डला तडे, मुंबई एअरपोर्टवर त्वरित लँडिंग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : स्पाईसजेटच्या विमानाच्या विंडशील्डच्या बाहेरील बाजूस टेकऑफ करण्यापूर्वी तडे गेल्याने विमानाला मुंबई विमानतळावर परत जावे लागले. स्पाईसजेट बोईंग 737 विमान (SG-385) मुंबईहून उत्तर प्रदेशातील गोरखपूरला टेकऑफ करणार होते, परंतु फ्लाइटच्या विंडशील्डच्या बाहेरील बाजूस तडे गेल्याचे आढळल्याने विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले, यामुळे मोठा धोका टळला.

स्पाईसजेट बोईंग 737 विमान एसजी-385 (मुंबई-गोरखपूर) प्रवास करणार होते. पण विंडशील्डला तडे गेल्याचे दिसून आले. पीआयसीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. एटीसीला माहिती देण्यात आली आणि विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.

भारताच्या एव्हिएशन वॉचडॉग डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने यापूर्वी बोईंग 737 मॅक्स जेटवर बंदी घातली होती. एप्रिलमध्ये डीजीसीएने बोईंग 737 मॅक्स विमानाला काही अटींवर उड्डाण करण्याची परवानगी दिली होती. तथापि, भारतात व्यावसायिक वापरासाठी बोईंग 737 मॅक्स विमानाचा वापर करण्यास मनाई आहे.

या वर्षी 20 एप्रिल रोजी DGCA ने जारी केलेल्या आदेशाने 13 मार्च 2019 च्या मागील आदेशाला काही अपवाद केले होते ज्याने पाच महिन्यांच्या कालावधीत दोन प्राणघातक क्रॅश झाल्यामुळे भारतात B737 Max च्या सर्व ऑपरेशन्सवर बंदी घातली होती. बोईंग 737 मॅक्स (लायन एअर फ्लाइट 610 आणि इथिओपियन एअरलाइन्स फ्लाइट 302) च्या अपघातानंतर महासंचालकांनी बोईंग मॅक्स जेट विमानांना ग्राउंड केले होते.

सुरक्षेच्या उद्देशाने महासंचालकांनी निर्देश दिले होते की, बोईंग कंपनी मॉडेल 737-8 आणि बोईंग कंपनी मॉडेल 737-9 यांचे संचालन 13 मार्च 2019 पासून भारतीय विमानतळांवरून/पर्यंत होणार नाही आणि भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करणार नाही.

ऑक्टोबर 2018 मध्ये, बोईंगच्या 737 नॅरो-बॉडी फॅमिलीमधील सर्वात नवीन मॉडेल 737 मॅक्स जकार्ता, इंडोनेशिया येथून टेकऑफ झाल्यानंतर लगेचच जावा समुद्रात कोसळले. त्यानंतर याच मॉडेलचे दुसरे विमान मार्च 2019 मध्ये इथियोपियामध्ये क्रॅश झाले. या दोन्ही विमान अपघातांमध्ये 346 जणांना आपला जीव गमवावा लागला. क्रॅशच्या तपासात जेटच्या पायलटिंग सिस्टीममधील त्रुटी, बोईंगच्या सुरक्षा स्टँडर्ड प्रक्रियेतील त्रुटी आणि कंपनीच्या अधिकार्‍यांकडून कव्हर अप केल्या गेल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT