Srinagar Terror Attack Video viral News Srinagar Terror Attack Video viral News
देश

Srinagar Terror Attack : आयएसआयकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील (Srinagar) सर्वांत वर्दळीचा परिसर असलेल्या लाल बाजार येथील नाका पोलिस दलावर मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला (Terror Attack) केला होता. या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद शहीद झाले. मात्र, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडल्याने पळून जाण्यास भाग पाडले. या दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी जारी केला आहे.

या हल्ल्याचा दावा आयएसआय (ISIS) आणि द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) केला आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी संघटना आहे. ही संघटना २०१९ सालापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये समोर आली आहे. त्यांनी हल्ल्याचे चित्रीकरण करण्यासाठी बॉडी कॅमेरा वापरला आणि जबाबदारी स्वीकारणारा व्हिडिओ जारी केला, असे जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आतापर्यंतच्या तपासात या हल्ल्यात (Terror Attack) किमान तीन दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. दोन दहशतवादी दुचाकीवर आले. त्यांनी पिस्तुलाने गोळीबार सुरू केला. हे जारी केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे, असेही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी हल्ले होऊ शकतात

श्रीनगरमध्ये (Srinagar) गेल्या १५ दिवसांतील ही पहिलीच दहशतवादी हल्ल्याची घटना आहे. अमरनाथ यात्रा सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच हल्ला आहे. सुरक्षा दलांना गुप्तचरांकडून समजले आहे की आणखी बरेच काही घडू शकते. हा तिसरा हल्ला आहे ज्यात दहशतवाद्यांनी बॉडी कॅमेऱ्यांचा वापर करून हल्ल्याचे चित्रीकरण केले. यावर्षीची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०२० मध्ये बारामुल्लामध्ये अशाच पद्धतीचा वापर केला होता. नंतर २०२१ मध्ये पंपोर बायपासजवळ याचा वापर करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

WPL 2026 All Team Players: दीप्ती शर्मा महागडी खेळाडू, तर मुंबई इंडियन्सनेही केरसाठी मोजले ३ कोटी; पाहा लिलावानंतरचे सर्व संघ

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Barshi Crime : बार्शीत एसटी वाहकाला मारहाण; कॉलर पकडून धमक्या, ३ हजार रुपये गायब; दोघांवर गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT