SBI ATM Rule esakal
देश

SBI चे ग्राहक असाल तर ATM मधून काढू शकाल फक्त 9,999 रुपये

SBI New Rule: ATM Fraud रोखण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवं पाऊल उचललं आहे.

सकाळ ऑनलाईन

SBI New Rule ATM:

एटीएम फसवणुकीच्या (ATM Fraud) वाढत्या घटना पाहता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट आणले आहे. एसबीआयने आपल्या एटीएम ऑपरेशन्सची सुरक्षा अपग्रेड (Security Upgrade) करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट केले आहे. तुम्हाला SBI ATM मधून 10 हजार किंवा त्याहून अधिक पैसे कोणत्याही त्रासाशिवाय काढायचे असतील तर तुम्ही ही संपूर्ण बातमी वाचा, जेणेकरून तुम्हाला सहज काढता येईल.

एटीएम फसवणूकीला लागणार लगाम (Prevents ATM Fraud)-

आतापर्यंत एसबीआय खातेधारक (SBI Account Holder) त्यांच्या दैनंदिन मर्यादेनुसार एटीएममधून दररोज पैसे काढू शकत होते, परंतु आता यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता जेव्हा एसबीआयचे ग्राहक एटीएममधून 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढण्यासाठी जातात, तेव्हा बँकेकडून त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी (OTP on Registered Mobile Number) पाठवला जाईल, जो ग्राहकाला एटीएम मशीनमध्ये टाइप करावा लागेल, या प्रक्रियेतून गेल्यानंतरच तुम्हाला ATM मधून पैसे काढता येतील. यामुळे एटीएम फसवणुकीला आळा बसेल, असा बँकेचा दावा आहे.

वाढत्या एटीएम फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. केवळ 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे काढणाऱ्या ग्राहकांना या प्रक्रियेतून जावे लागेल, तर 9,999 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे काढणाऱ्या ग्राहकांना OTP देण्याची गरज नाही.

10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढण्याची प्रक्रिया (Process to Withdraw more than 10000 Rs)-

1. एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ओटीपी लागेल.

2. रक्कम आणि पिन नंबर टाकल्यानंतर तुमच्या बँकेच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

3. हा OTP फक्त एकदाच व्यवहारासाठी वैध असेल.

4. यानंतर तुम्हाला एटीएम स्क्रीनवर बँकेच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी टाइप करावा लागेल

5. यामुळे स्टेट बँक कार्डधारक फसवणुकीपासून वाचू शकतील.

6. रात्री 8 नंतर सकाळी 8 वाजेपर्यंत 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख काढण्यासाठी, ग्राहकाला त्याच्या मोबाइल फोनवर प्राप्त झालेल्या डेबिट कार्ड पिनसह OTP प्रविष्ट करावा लागेल. ही सुविधा स्टेट बँकेच्या सर्व एटीएममध्ये उपलब्ध आहे. SBI चं ATM नसल्यास त्यामधून OTP आधारित पैसे काढणे उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT