liquor 
देश

मद्यविक्रीच्या परवानगीबाबत राज्यांची केंद्राकडे मागणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः राज्याच्या उत्पन्नवाढीसाठी लॉकडाऊन कालावधीत मद्याच्या दुकानांवरील बंदी उठवण्याची मागणी काही राज्य सरकारांनी केंद्राकडे केली असल्याचे समजते. केरळ, पंजाबसारख्या काही राज्यांनी यापूर्वीच हा निर्णय घेतला आहे, पण याची सार्वत्रिक  अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह होत आहे. मात्र कोरोनाचा सामना करताना अनेक राज्य सरकारना निधीची चाचणी भासत आहे. त्यामुळे मद्यविक्रीतून जमा होणारा महसूल मोठ्या प्रमाणावर असल्याने ही मागणी केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व विभागांना कर्मचाऱ्यांचे वेतन सोडून अन्य खर्च बंद करण्याची सूचना केली आहे. कोरोनामुळे कोणतेही उत्पन्न मिळेल याची हमी नाही असे त्यांनी सांगितले.  अनेक राज्य सरकारनी कर्जावरही मर्यादा घातली आहे. त्यावेळीही व्याजदर नऊ टक्के असेल याकडे लक्ष दिले आहे. काहींनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे, तसेच राज्यातील अनेक प्रकल्पावरील काम थांबले आहे, याकडे केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी लक्ष वेधले. 

लॉकडाऊनमुळे जीएसटीमध्येही घट झाली आहे. त्यातच केंद्र सरकार जीएसटीचा परतावा देण्यास उशीर करत असल्याची तक्रार आहे. मात्र त्याचबरोबर मद्याची दुकाने बंद असली तरी अवैध दारुची विक्री सुरु झाल्याने नवे प्रश्न निर्माण होत आहेत. दारु न मिळाल्याने केरळमध्ये काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  

राष्ट्रीय पाहणीनुसार सात वर्षात देशातील मद्यसेवन 38 टक्क्यांनी वाढले आहे. दिल्लीस मद्यविक्रीतून दरवर्षी 5 हजार कोटींचा महसूल मिळतो तर कर्नाटकला 21 हजार 400 कोटींचा. केरळ, गोवा, उत्तर प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगालमध्ये मद्यविक्रीस काही प्रमाणात सुरुवात झाली. दिल्ली आणि कर्नाटक हा विचार करीत आहे. केरळप्रमाणे पश्चिम बंगालही मद्याची घरपोच सेवा देण्यासाठी योजना तयार करीत आहे. अनेक राज्य सरकार मद्यविक्रीस परवानगी देण्यासाठी 2006 च्या खाद्य सुरक्षा आणि मानांकन कायद्याचा आधार घेत आहेत. त्यात मद्याचा खाद्यपदार्थात समावेश आहे. आणि खाद्यपदार्थ पुरवणे ही जीवनावश्यक आहे. मद्यविक्रीस सुरुवात न केल्यास गावठी दारु विक्रीचे प्रमाण वाढेल आणि त्यातून नवे गंभीर प्रश्न निर्माण होतील, अशीही भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT