पेट्रोल पंप.
पेट्रोल पंप. Sakal
देश

देशातील पेट्रोल पंप उद्या बंद राहणार

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - देशभरात दिल्ली व महाराष्ट्रासह २४ राज्यांतील प्रमुख पेट्रोल-डिझेल वितरक व पेट्रोल पंपचालकांनी उद्या (दि. ३१) देशातील किमान ७० हजार पेट्रोल पंपांवरील पेट्रोल-डिझेलची खरेदी पूर्ण बंद ठेवण्याचे आंदोलन पुकारले आहे. यामुळे देशाच्या काही भगांत पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम पदार्थांवरील कमिशन वाढविण्याबाबत केंद्र सरकार व तेल विपणन कंपन्या यांनी चालविलेल्या टोलवाटोलवीच्या निषेधार्त हे आंदोलन असले तरी सामान्य लोकांना त्रास होऊ नये म्हणून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

भारतीय पेट्रोल पंप वितरण संघटनेचे अध्यक्ष अनुराग नारायण व अनिल यादव, विक्रम सिंघानिया, अतुल विशाल यांनी आज प्रस्तावित आंदोलनाची माहिती दिली. य बैठकीत संघटनेचे महाराष्टाचे अध्यक्ष उदय लाहोट व इतर राज्यांचे अध्यक्ष झूमद्वारे सहभागी झाले होते. पेट्रोल पंपचालकांचे कमिशन मागील ५ वर्षांत वाढविले गेलेले नाही व याबाबत अनेकदा बोलूनही तेल कंपन्यांनी तोंडाला पाने पुसली असा आरोप नारायण यांनी केला. प्रस्तावित बंदची माहिती मिळताच सरकारी तेल कंपन्यांनी आजच बहुतांश राज्यातील पेट्रोल डिझेलचा पुरवठा कमी करण्याची चाल खेळल्याचे सांगताना ते म्हणाले की २०१७ मध्ये मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कमिशन प्रती लीटर अनुक्रमे १३ रू व १६ रूपयांनी वाढविले. याचा दर ६ महिन्यांनी फेरआढावा घएण्याचा करार त्यावेळी झाला होता. पण तेल कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही.

याच्या निर्षेधार्त महाराष्ट्रासह तमिलनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश येथील पेट्रोल पंपमालक उद्या एका दिवसाचा प्रतीकात्मक बंद पुकारणार आहेत. २०१७ नंतर पेट्रोल व डिझेलचे दर दुपटीहून जास्त महागले तरी हे कमीशन जैसे थे आहे. सध्या पेट्रोलमागे प्रतीलीटर ३.८५ रूपये व डिझेलमागे प्रतीलीटर २.५८ रूपये लीटर कमीशन मिळते. वाढत्या महागाईच्या तुलनेत ते तुटपुंजे आहे. त्यातच सरकारने मागील नोव्हेंबरमध्ये व या महिन्यात दोनदा उत्पादन शुल्कात घट केली त्यामुळए तेल कंपन्यांना फायदा झाला पण पेट्रोल डिझेल वितरकांना प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागला. आज निमशहरी व ग्रामीण भागासह महामार्गांवरील बहुतांश पेट्रोल पंप बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत असेही ते म्हणाले.

देशातील एकूण पेट्रोल पंप ७० हजार

  • महाराष्ट्रातील ६५००

  • दिल्लीतील - ४००

  • दिल्लीत रोजची एकूण विक्री ३० लाख लीटर पेट्रोल व २७ लाख लीटर डिझेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT