Railway-Engine-Indian 
देश

भारतीय स्वदेशी बनावटीची दोन वेगवान रेल्वे इंजिने सज्ज; चाचण्या यशस्वी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेग वाढविण्यासाठी संपूर्णपणे भारतात तयार झालेली दोन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिने वाहतुकीसाठी सज्ज झाली आहेत. प्रती तास १६० किलोमीटर इतक्‍या वेगाने रेल्वे गाडी खेचण्याची क्षमता असलेल्या व मेक इन इंडिया योजनेअंतर्गत तयार केलेल्या या इंजिनांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. यातील एक इंजिन नवी दिल्ली- मुंबई राजधानी एक्‍स्प्रेसला जोडण्यात येणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. ही नवीन स्वदेशी इंजिने प्रचंड मोठा आवाज न करणारी, प्रदूषणमुक्त व पर्यावरणास अनुकूल असतील असे तंत्रज्ञांनी म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (सीएलडब्ल्यू) कारखान्यातील तंत्रज्ञांनी ‘एयरोडायनेमिक डिझाइन’च्या ‘व्हीएपी -५’ चा वापर करून या दोन्ही इलेक्ट्रिक इंजिनांची निर्मिती केली आहे. त्यांना ३५०१२ व ३५०१३ (मेक इन इंडिया) असे क्रमांक देण्यात आले आहेत. रेल्वेने आज दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी ६००० अश्‍वशक्तीच्या या इंजिनांमध्ये प्रती तास १६० किलोमीटर इतक्‍या वेगाने धावतानाही येणारे तांत्रिक अडथळे (एअर ड्रॅग्रज) कमी करता येतील, अशी रचना करण्यात आली आहे.

प्रदूषण टाळता येणार
ही इंजिने संपूर्णपणे विजेवर धावणारी असल्याने त्यामुळे प्रदूषणही टाळता येणार आहे. दोन्ही इंजिनांत आयजीबीटी आधारित पर्पल्सन यंत्रणाही बसविण्यात आली आहे.  पहिल्या दोन्ही स्वदेशी इंजिनांचा उपयोग दिल्ली-मुंबई व दिल्ली-कोलकाता या मार्गांवरील प्रिमिअम प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी करण्यात येणार आहे.

कंपोझिट कन्व्हर्टरची सोय
दिल्ली ते मुंबई व दिल्ली ते कोलकता या दोन्ही मार्गांवर फक्त मालवाहतुकीसाठीच्याडीएफसी कॉरिडॉरचे कामही प्रगतीपथावर असून तो २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यामुळे प्रवासी गाड्यांना होणारा विलंब टळेल अशी आशा रेल्वेला आहे. या गाड्यांचे डबे व पेन्ट्री कारमधील वीजपुरवठा व वातानुकूलन यंत्रणेत व्यत्यय येऊ नये यासाठी इंजिनांमध्ये कंपोझिट कन्व्हर्टरची रचना करण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT