rajnikant main.jpg 
देश

निवडणुकीच्या तयारीत सुपरस्टार रजनीकांत, आज करु शकतात मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्यानंतर दक्षिण भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान रजनी मक्कल मंद्रमचे प्रमुख रजनीकांत यांनी आज (दि.30) त्यांच्या पक्षाच्या जिल्हा सचिवांची चेन्नईत बैठक बोलावली आहे. रजनीकांत हे बैठकीसाठी आपल्या निवासस्थानाहून रवानाही झाले आहेत. पक्षाच्या आगामी रणनीतिबाबत ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांच्या घोषणेआधीच चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. 

2021 मध्ये तमिळनाडूत विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तमिळनाडूच्या सर्व राजकीय पक्षांच्या नजरा रजनीकांत यांच्या निर्णयावर टिकून आहेत. आजच्या बैठकीनंतर रजनीकांत हे निवडणूक लढवणार की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान, मंद्रम ही संघटना तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात रुपांतर करण्यासाठी बनवलेली संघटना असल्याचे बोलले जाते. 

रजनीकांत मागील दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या त्यांना राजकारणात प्रवेश केलेला नाही. परंतु, मागील वर्षी अभिनेता कमल हासन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकते असे बोलले जात होते. 

यापूर्वी रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या राजकारणात क्रांती आणायची असल्याचे म्हटले होते. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असेही त्यानी स्पष्ट केले होते. गेल्या महिन्यात रजनीकांत यांच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले होते. यामुळे तमिळनाडूतील राजकारणात खळबळ उडाली होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रजनीकात यांचा नियोजित राजकीय प्रवेश टळू शकतो, असे त्यात म्हटले होते. रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर चिंतेत असल्याचे पत्रात म्हटले होते. यामुळे राजकारणात सहभागी होणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. परंतु, रजनीकांत यांनी हे पत्र आपण लिहिले नसल्याचे स्पष्ट केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF Fund Withdrawal: पीएफ सदस्यांसाठी मोठी खुशखबर; एका क्लिकवर UPI द्वारे त्वरित रक्कम काढता येणार; प्रक्रिया काय? जाणून घ्या..

Nanded News : पैनगंगा नदीपात्रात धक्कादायक घटना; मुरली बंधाऱ्यात फारीत बांधलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ!

Eknath Shinde : "विरोधकांना दाखवणार कात्रजचा घाट"- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कात्रजमधून शिवसेनेचा एल्गार

"माझी चूक झाली" शशांक केतकरवर टीका करणाऱ्या लेखकाने मागितली माफी ; "मी लिहिलं होतं तमाशा करू नको.."

Recruitment: बीडमध्ये ७८१ पदांसाठी भरती! कोणती पदं भरली जाणार? शैक्षणिक पात्रता काय? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT