Supreme Court 
देश

सॉलिसिटर जनरल 'बिझी'; लोन मॉरेटोरियमवरील सुनावणी ढकलली पुढे

सकाळवृत्तसेवा

लोन मॉरेटोरियमबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कोरोना काळात कर्जाचे हप्ते भरण्यापासून काही वेळ सूट मिळाली होती. सुप्रीम कोर्टात कर्जावर लोन मॉरेटोरियम घेण्याऱ्या लोकांना व्याजावर व्याज लागू होऊ नये यासाठीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी 5 नोव्हेंबरपर्यंत टाळण्यात आली आहे. याचं कारण आहे की, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता इतर कोणत्यातरी कामात व्यस्त आहेत. 

जस्टीस अशोक भूषण, आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांचा बेंच सहा महिन्याच्या लोन मोरेटोरियमवरील याचिकेवर सुनावणी करत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने दिलासा देणारा एक आदेश आधीच जाहीर केला आहे. केंद्र सरकारने मार्च 2020 पासून ते ऑगस्ट 2020 पर्यंत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना लोन मॉरेटोरियमची सुविधा दिली होती. सुप्रीम कोर्टाने याआधीच सरकारला सांगितलं  होतं की सरकारने लवकरात लवकर व्याज माफीची योजना लागू करायला हवी. कोर्टाने म्हटलं होतं की लोकांची दिवाळी यावेळी सरकारच्या हातात आहे. 

याआधी सुप्रीम कोर्टाने लोन मोरेटोरियमच्या प्रकरणातील शेवटची सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी केली होती. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, व्याजावर व्याज लागू होण्यापासून सूट मिळण्याची योजना लवकरात लवकर लागू करायला हवी. यादरम्यानच केंद्राने सर्क्यूलर जाहीर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ मागितला होता. सॉलिसीटर जनरल यांनी म्हटलं की सरकार 15 नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भातील सर्क्यूलर जाहीर करेल. याला नकार देत कोर्टाने 2 नोव्हेंबरपर्यंत सर्क्यूलर जाहीर करण्याचा आदेश दिला होता. जेंव्हा निर्णय झालाच आहे तर तो लागू करायला इतकी दिरंगाई कशासाठी? असा सवाल कोर्टाने विचारला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT