Supreme Court Dismissed Nawab Malik Plea Sakal
देश

'आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही', SC चा मलिकांना दणका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दाऊद मनी लाँड्रींगप्रकरणी (Dawood Money Laundering Case) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. तुरुंगातून सुटका करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. सध्या तपास सुरू आहे. आम्ही या टप्प्यावर हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्या न्यायालयात जावे, असं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी म्हटलं आहे.

दाऊद इब्राहीमचा माणूस आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंडसोबत व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिकांवर आहे. ईडीने त्यांना फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. तब्बल ८ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने मलिकांना ईडी कोठडी सुनावली. सध्या मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. आज मलिकांची न्यायालयीन कोठडी संपत आहे. आज परत त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

मलिकांनी तुरुंगातून सुटका मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर मलिकांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देत मलिकांची याचिका फेटाळून लावली. ईडीने मलिकांविरोधात मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायालय कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आरोपपत्राची दखल घेईल, असं ईडीच्या वकिलांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. गेल्या आठवड्यात मलिकांच्या आठ मालमत्ता ईडीने जप्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : "अशोक खरातला मारून टाका", भोंदूबाबाच्या कारनाम्यावर संभाजी भिडे संतापले

Gold Rate Today: अमेरिकेच्या हालचालींनी सोनं हललं! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या रांगा

आर अश्विन, बावळट! अर्जुन तेंडुलकवर केलेल्या विधानामुळे भारताच्या माजी फिरकीपटूवर जोरदार टीका; अर्जुनवर बोलणारा तू कोण?

'पप्पा तुम्ही दुसरं लग्न करा' मुलींनी प्रकाश राज यांना लग्नाचा दिलेला सल्ला, 12 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न आणि...

SCROLL FOR NEXT